उदयनराजे म्हणतात मी संजय राऊतांना ओळखत नाही... राजघराण्याबद्दल बोललं तर याद राखा....

उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांनी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांची खिल्ली उडवली.
Udayanraje Bhosale on Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale on Udayanraje Bhosale sarkarnama

सातारा - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात उदयनराजे भोसले ( Udayan Raje Bhosale ) यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी संतप्त होत मी संजय राऊत यांना ओळखत नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली. ( Udayan Raje says I don't know Sanjay Raut ... If you talk about royalty, remember ... )

सातारा येथील एका कार्यक्रमानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याबाबत आक्षेप घेतले होते. या संदर्भात विचारले असता उदयनराजे म्हणाले, तो कोण आहे. मी त्याला ओळखतही नाही. आयडेंटीटी नसलेल्या लोकांबद्दल काय बोलणार. हे लोक मला माहितीच नाहीत. तर त्यांच्याबाबत मी काय बोलणार.

Udayanraje Bhosale on Udayanraje Bhosale
Video: संजय राऊत कोण, मला माहित नाही; राऊतांचं नाव घेताच उदयनराजे का संतापले?

उदयनराजे म्हणाले, आम्ही कुणाच्या बद्दल वाईट बोलत नाही. आमच्या बद्दल कोणी वाईट बोलाल तर आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. तुमच्या घराण्याबद्दल कोणी काही बोलले. घराणे छोटे असू द्या अथवा मोठे. प्रत्येकाला स्वाभिमान आहे. कोण गप्प बसणार आहे, असे सांगत कॉलर उडवत ते म्हणाले, काय बाकीच पेटलं तरी चालेल, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com