Satara Wagh Nakh News : उदयनराजेंनंतर फडणवीसही गोंधळले; औरंगजेब की अफझल खान...?

Udayanraje, Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वत:चा जीव धोक्यात घालून जीवाचा पर्वा न करता अफजल खानाशी भिडले होते.
Udaynraje, Devendra Fadnavis
Udaynraje, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर गेलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे आजपासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पाहण्यासाठी नागरीकांना खुली करण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद॒घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, तसेच सर्व आमदार उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना खासदार उदयनराजेंचा गोंधळ उडाला. त्यांनी प्रतापगडावर अफझल खानाचा वध करताना शिवाजी महाराजांनी जी वाघनखे वापरली त्या वाघनखांबद्दल बोलताना उदयनराजे Udaynraje यांनी औरंगजेबाचा उल्लेख केला.

उदयनराजे म्हणाले, येथे आणल्यानंतर त्या वाघनखांकडे केवळ वाघनखे म्हणून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस स्वत:चा जीव धोक्यात घालून जीवाचा पर्वा न करता कारण की औरंगजेबासमोर त्यांचे फारस काय त्यांची उंचीपण तेवढी नव्हती. पण, त्यावेळेस त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून संपूर्ण वाघनखांच्या माध्यमातून इतिहास घडविला.

त्यांच्यासमोर विचार होता की लोकांचं भलं व्हावं. माझा जीव गेला तरी चालेल. त्यामुळे अशा एका व्यक्तीच्या बाबत वाघनखे इथे आणली जातात. तेव्हा त्यांचे पूजन करण्याऐवजी कृपया कोणी वाद विवाद निर्माण करू नये. असे मला आवर्जून सांगावे वाटते.

Udaynraje, Devendra Fadnavis
Sharad Pawar : शरद पवारांची विधानसभेसाठी 'यंग ब्रिगेड' तयार; रोहित पाटलांनंतर आता दुसरा उमेदवार जाहीर

देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले, हा क्षण आनंदाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या वाघनखांचा वापर करुन या स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाचा सरदार असलेल्या अफझल खानाचा वध केला होता. आपण पिढ्यान पिढ्या ऐकत आलो आहोत, ते प्रमुख शस्त्र लंडनच्या म्युझियममधून साताऱ्यातील वस्तूसंग्रहालयात दर्शनाकरिता उपलब्ध झाली आहेत. यापेक्षा मोठे भाग्य असूच शकत नाही.

उदयनराजेंनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस हेही आपल्या भाषणात चुकीचा उल्लेख केला. मुळात अफझल खान हा औरंगजेबाचा सरदार नव्हता तर तो विजापूर सल्तनतच्या आदिलशाह दुसरा याचा प्रमुख सरदार होता. त्यामुळे सुरवातीला उदयनराजेंचा गोंधळ झाला. त्यानंतर फडणवीसही गोंधळले. हा गोंधळ कार्यक्रमाला उपस्थित अनेक युवकांसह काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. पण, त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.

Udaynraje, Devendra Fadnavis
Imtiyaz Jaleel News: 'माझ्या घरावर हल्ला सहन करेल, पण मशिदीवर नाही'; इम्तियाज जलील भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com