भेट झाली नाही तर, शिवेंद्रसिंहराजेंना गाठणारच : उदयनराजे

गेले काही दिवस उदयनराजेंच्‍या नावावर शिवेंद्रसिंहराजे आणि इतरांचे एकमत होत नसल्‍याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच अनुषंगाने काल उदयनराजेंनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्‍यासह इतर प्रमुखांच्‍या भेटीगाठी घेतल्‍या.
Udayanraje Bhosale, Shivenraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivenraraje Bhosaledesign@apglobale.com

सातारा : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्‍ह्‍यातील प्रमुख नेत्‍यांच्‍या गाठीभेटींचा सपाटा लावला आहे. हा सपाटा लावणाऱ्या उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचीही भेट घेणार असल्‍याचे सांगत त्‍यांची भेट झाली नाही तर, त्‍यांना गाठणारच, असे सूचक वक्‍तव्‍य आज साताऱ्यात केले. या वक्‍तव्‍यामुळे जिल्‍हा बँक निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे असणारे महत्व पुन्‍हा एकदा अधोरेखित झाले आहे.

जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीची प्रक्रिया वेगात आली असून अर्ज माघारीचा उद्या (ता. १०) शेवटचा दिवस आहे. निवडणूक बिनविरोध करण्‍यासाठी विविध गटातून अर्ज भरलेल्‍यांना माघार घेण्‍यासाठीच्‍या सुचना राष्‍ट्रवादीकडून देण्‍याबरोबरच उमेदवारी अंतिम करण्‍याचे काम सुरु आहे. कोणत्‍याही परिस्‍थितीत उदयनराजेंना राष्‍ट्रवादीच्‍या पॅनेलमध्‍ये स्‍थान न देण्‍याचे प्रयत्‍न सुरु असू्न त्‍याबाबत बारामती झालेल्‍या बैठकीत खासदार उदयनराजेंबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा करण्‍याच्‍या सुचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना केल्‍या होत्‍या. यानुसार झालेल्‍या बैठकीत शिवेंद्रसिंहराजेंसह इतरांनी पुन्‍हा एकदा उदयनराजेंच्‍या उमेदवारीस विरोध दर्शवत निर्णय बारामतीकरांच्‍या हाती सोपविण्‍याची विनंती रामराजेंना केली.

Udayanraje Bhosale, Shivenraraje Bhosale
"जिल्हा बँक शेतकऱ्यांची आहे"- उदयनराजे भोसले; पाहा व्हिडिओ

गेले काही दिवस उदयनराजेंच्‍या नावावर शिवेंद्रसिंहराजे आणि इतरांचे एकमत होत नसल्‍याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच अनुषंगाने काल उदयनराजेंनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्‍यासह इतर प्रमुखांच्‍या भेटीगाठी घेतल्‍या. आज त्‍यांनी ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. भेट घेतल्‍यानंतर पत्रकारांनी त्‍यांना शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेणार का, असे विचारले. यावर उदयनराजे म्‍हणाले, हो... ते पुण्‍याला गेल्‍याचे मला समजलेय, आले कि भेटणारच, का नाही. त्‍यांना तर भेटलच पाहिजे. नाही भेटल तर त्‍यांना गाठणारच. पण भेटणारच, असे वक्‍तव्‍य केले. या वक्‍यव्‍यामुळे जिल्‍हा बँक निवडणुकीतील शिवेंद्रसिंहराजेंचे महत्व पुन्‍हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्‍या दोघांची गाठभेट कधी होतेय, याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com