Udayanraje : उदयनराजेंनी दिल्लीतून मराठा, ओबीसी नेत्यांना फटकारलं; म्हणाले, आरक्षणाचं राजकारण...

Maratha Vs OBC reservation : जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यातून कोणत्या जातीची लोकसंख्या किती त्यानुसार आरक्षण देता येईल, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.
Udayanraje
UdayanrajeSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. तसेच राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके या लोकांनी राजकारण करु नये.

या प्रश्नावर एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व आरक्षण प्रश्नातून मार्ग काढावा. त्यातूनच कोण राजकारण करतेय आणि कोण नाही, हे लोकांना कळेल, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षण प्रश्नाचे राजकारण करू नका, असे ठणकावले.

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी केली. त्यानंतर दिल्लीतील निवासस्थानी उदयनराजे भोसले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरुन राजकारण करु नये, असा सल्ला प्रमुख नेत्यांना दिला आहे.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकजण घेत असतो. पण आज विविध जाती तेढ निर्माण झाली आहे. मुळात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यातून कोणत्या जातीची लोकसंख्या किती त्यानुसार आरक्षण देता येईल.

आज जी परिस्थिती पहायला मिळतेय त्यात खास करुन राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar, जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके असतील या लोकांनी राजकारण करु नये. त्यापेक्षा एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व मार्ग काढावा. त्यातून कोण राजकारण करतेय आणि कोण नाही, हे लोकांना कळेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

Udayanraje
Sharad Pawar Vs Ajit Pawar : तिकडे दुर्राणींनी साथ सोडली; इकडे 'या' महिला नेत्या अजितदादांच्या भेटीला, शरद पवारांना धक्का?

जरांगेकडून होणाऱ्या विविध वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारले, असता उदयनराजे म्हणाले, त्याबद्दल न बोललेले बरे. पण, सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय करणे आवश्यक आहे. घटना सोडून कोणीही आरक्षण देऊ शकत नाही. शरद पवार, हाके किंवा जरांगे पाटील Manoj Jarange असतील, यांच्याकडे असा काही मार्ग असेल तर त्यांनी सांगावा. जरांगे पाटलांना तुम्ही काय सल्ला द्याल, यावर ते म्हणाले, मी काय सल्ला देणार. मी सल्ला देण्याइतका मोठा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Udayanraje
Jitesh Antapurkar News : ...म्हणून काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकरांनी कॅमेरे दिसताच काढला पळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com