Satara BJP : उदयनराजेंना लवकरच मोठी जबाबदारी देणार... अजयकुमार मिश्रा

Udayanraje Bhosale केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली.
Kalpanaraje Bhosale] Udayanraje Bhosale, Ajaykumar Mishra, jaykumar Gore
Kalpanaraje Bhosale] Udayanraje Bhosale, Ajaykumar Mishra, jaykumar GorePramod Ingale, Satara

Satara BJP News : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी झालेल्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. छत्रपती घराण्याने आजपर्यंत आम्हाला प्रेरणा देण्याचे काम केले आहे. येणाऱ्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा Ajay Mishra यांनी दिली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले Kalpanaraje Bhosale त्यांनी मंत्री मिश्रा यांचे औक्षण केलं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केलं. राजघराण्याच्या स्वागताने मिश्रा भारावून गेले.

यावेळी त्यांनी येथील भवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, कराडचे अतुल भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, धैर्यशिल कदम, सुनील काटकर, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Kalpanaraje Bhosale] Udayanraje Bhosale, Ajaykumar Mishra, jaykumar Gore
NCP News : BJP मध्ये जाण्याचा विचार करणारे NCP मध्ये असू शकतात..; जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?

अजयकुमार मिश्रा म्हणाले, छत्रपतींचे घराण्याविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. या घराण्यातून आम्हाला कायम प्रेरणा मिळात असते. आज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या स्वागताने मी भारावून गेलो असून आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. येणाऱ्या काळात खासदार उदयनराजे भोसले यांना आम्ही खूप मोठी जबाबदारी देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Kalpanaraje Bhosale] Udayanraje Bhosale, Ajaykumar Mishra, jaykumar Gore
Nana Patole :राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पुरोगामी विचारधारेला धरुन चालेल |Congress | NCP |Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com