Udayanraje News : उदयनराजे देणार अजितदादांना शुभेच्छा...फोनवरुन बोलणंही झालंय....

Satara News खासदार उदयनराजे भोसले यांनी आज कास तलावाच्या कामाची पहाणी करुन या धरणातून सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाइनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.
Udayanraje Bhosale, Ajit Pawar
Udayanraje Bhosale, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : शिंदे, फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे सहभागी झाले असून त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. अजित पवार आणि उदयनराजे यांच्यातील वितुष्ठ सर्वज्ञात आहे. पण, आता उपमुख्यमंत्री अजित पवार हेच भाजप, शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाल्याने खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील सर्व गोष्टी विसरत त्यांना फोनवरुन संपर्क करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज कास तलावाच्या कामाची पहाणी करुन या धरणातून सातारा शहराला Satara city पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाइनच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. यावेळी सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना तुम्ही अजितदादांना शुभेच्छा दिल्यात का, यावर खासदार उदयनराजे म्हणाले, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरु असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटू व चर्चा करु, असे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मी त्यांची भेट घेणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे.

Udayanraje Bhosale, Ajit Pawar
Satara New : उपमुख्‍यमंत्री दोन, मग उपसरपंचही दोन हवेत...सोनापूर ग्रामपंचायतीने केला ठराव

याबाबत खुद्द उदयनराजेंनी याविषयीच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, त्यांचा माझा फोन झाला आहे. सध्या त्यांची धावपळ सुरु असून सर्व विषय मार्गी लावल्यानंतर आपण भेटून चर्चा करु. त्यानुसार मी त्यांची भेट देणार असून त्यांना शुभेच्छा देणार आहे.

Udayanraje Bhosale, Ajit Pawar
Devendra Fadanavis स्पष्टच बोलले | BJP | Shivsena | Udhhav Thackeray | Sarkarnama Video

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com