उजनीचे पाणी पेटले : भरणेंनी योजना मंजूर करताच सोलापुरातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Ujani Dam, Ujani's water issue News, Solapur Latest News in Marathi
Ujani Dam, Ujani's water issue News, Solapur Latest News in Marathi Sarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : सोलापूर (solapur) जिल्ह्यात असलेल्या उजनी धरणातील (Ujani Dam) दोन टीएमसी पाणी इंदापूर (Indapur) तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी मंजूर केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते संजय पाटील घाटणेकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Ujani's water issue: NCP leader Sanjay Patil Ghatnekar warned of agitation)

सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी पाणी योजनेसाठी उजनीतून दोन टीएमसी पाणी मंजूर करून घेतले आहे. सोलापूरच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी उचलण्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या (ता. १४ मे) कुर्डूवाडी येथे राष्ट्रवादीचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. (Solapur Latest News in Marathi)

Ujani Dam, Ujani's water issue News, Solapur Latest News in Marathi
सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐकून घ्यावं लागेल : शिवसेना नेत्याचा खणखणीत इशारा

लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्यास सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत आहे. त्यामुळे या प्रश्नावरून वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ३४८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हक्काचे दोन टीएमसी पाणी कमी होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Ujani Dam, Ujani's water issue News, Solapur Latest News in Marathi
‘फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे’

दरम्यान, यापूर्वीही लाकडी निंबोडी पाणी योजनेसाठी उजनी धरणातून पाणी उचलण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. सर्वपक्षीय विरोधानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही‌ योजना रद्द करत असल्याचे पत्रक काढले होते. त्यानंतर आत्ता पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी राजकीय वजन वापरून या योजनेसाठी निधी मंजूर करून घेतला आहे. या प्रश्नावरून सोलापूर व पुणे जिल्ह्यात पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com