'सदाभाऊ, तुमच्या उधारीची पावती, राष्ट्रवादीच्या नावावर का फाडता?'

सदाभाऊ खोत यांच्या राष्ट्रवादीवरील आरोपाला उमेश पाटील यांनी दिले उत्तर
Sadabhau Khot-Umesh Patil
Sadabhau Khot-Umesh PatilSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padlkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांना राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची ॲलर्जीच आहे. राजकारणात मोठे होण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी या दोघांना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केल्याशिवाय संधी मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी केला. आमदार सदाभाऊ खोत सांगोला तालुक्यातील त्या हॉटेल चालकाची उधारी ठेवणार आणि षडयंत्र रचले म्हणून राष्ट्रवादीच्या नावावर पावती फाडणार? हे बरोबर नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. (Umesh Patil responds to Sadabhau Khot's allegation against NCP)

Sadabhau Khot-Umesh Patil
पंचायतराज समितीच्या पाहुणचारासाठी 3 कोटी गोळा केले..? विक्रम काळेंनी कानावर हात ठेवले!

प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, मंत्री राहिलेल्या व आमदार असलेल्या व्यक्तींकडून एखादा माणूस अशा पद्धतीने पैसे मागतो, हॉटेल चालक अशोक शिनगारे यांनी आमदार खोत यांच्याकडे वारंवार पैसे मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्याने शेवटी त्रस्त होऊन त्यांनी हे पाऊल उचलले असावे. सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये माढा लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यांना सोलापूर जिल्ह्यातील जनतेने वर्गणी गोळा करून निधी दिला होता. सोलापूर जिल्ह्याने त्यांना व्होट आणि नोट दिले आहे, सोलापूर जिल्ह्यातील जनता आमदार खोत यांना चांगल्या पध्दतीने ओळखत असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले.

Sadabhau Khot-Umesh Patil
समाधान आवताडेंनी पहिला डाव जिंकला... समविचाराचे ३६ अर्ज पहिल्या झटक्यात बाद!

एवढ्या मोठ्या निवडणुकीत जेवण, वाहने, झेंडे यासह अनेक बाबींबर खर्च होत असतो. उधारीची रक्कमही फार मोठी लाखांमध्ये नाही, हजारांमध्ये असलेली ही उधारीची रक्कम आमदार खोत यांनी देऊन मनाचा उमदेपणा दाखवायला हवा होता. आमदार खोत या घटनेला राजकीय रंग देत आहेत. या घटनेला राजकीय रंग देऊ नये, या घटनेमागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या हात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. मात्र, ही घटना उत्स्फुर्तपणे घडली आहे, अशी घटना कोणत्याही नेत्याच्या बाबतीत घडू नये, अशी अपेक्षाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com