नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली?

भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी लक्ष्य करत टीका केली.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

अहमदनगर - राज्यातील अल्पसंख्यांक विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ( Nawab Malik ) यांना काल ( बुधवारी ) अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली. या अटके नंतर भाजप व महाविकास आघाडीकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांनी लक्ष्य करत टीका केली. ( Under whose pressure did the Chief Minister not accept the resignation of Nawab Malik? )

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, मुंबईसह राज्याला असुरक्षित करणाऱ्या व्यक्तींसमवेत अर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
सुजय विखे पाटील निघाले दुबईला

त्यांनी पुढे म्हंटले आहे की, 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरापराध माणसे मृत्यूमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्‍तींशी मंत्री नबाब मलिक यांचे मनी लाँडरींग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली. तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील तर देशहीताची ही प्रतारणाच म्हणावी लागेल.

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहभागामुळे राजीनामा घेणारे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत पाठराखण करीत असल्याकडेही आमदार विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, वाइनविक्रीच्या परवानगीत मोठा भ्रष्टाचार...

मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे? नबाब मलिकांचे बॉम्ब स्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या अर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी कडून सुरू आहे. अशा लोकांना बरोबर घेवून शिवसेना राज्य करणार का?, असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला.

Radhakrishna Vikhe Patil
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या लढाईत आम्ही तुमच्यासोबत आहोत...

भाजपने मंत्री नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. भाजपचे सर्व कार्यकर्ते आजपासून रस्त्यावर उतरले आहेत. नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत पक्षाच्‍यावतीने तीव्र आंदोलनाला इशाराही आमदार विखे पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com