२१-०...,सौरभबाबा हिरो...; प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व

प्रतापगड कारखान्याच्या Pratapgad Sugarfactory Election संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी सौरभ शिंदे Saurab Shinde यांच्या पॅनेलने तीन जागा या अगोदरच बिनविरोध Unopposed झाल्या होत्या.
Saurab Shinde Jallosh
Saurab Shinde JalloshKudal Reporter

कुडाळ : जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतमोजणीत सौरभ शिंदे गटाच्या संस्थापक सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. सर्व उमेदवार सुमारे 1200 च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या.

प्रतापगड कारखान्यासाठी १४ मार्चला मतदान झाली होती. त्यामध्ये ३२१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता व सरासरी ५२ टक्के मतदान झाले होते. जावळी व महाबळेश्वर तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या प्रतापगड कारखान्याची ६१५६ सभासद संख्या असून यापैकी ३२१५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक झाली.

Saurab Shinde Jallosh
शिवेंद्रसिंहराजे म्हणतात, उदयनराजेंना माझं बोलणं झोंबलं....

त्यापैकी सौरभ शिंदे यांच्या पॅनेलने तीन जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १८ जागांसाठी एकूण ३४ उमेदवार रिंगणात होते. सौरभ शिंदे यांच्या संस्थापक सहकार पॅनेल विरूद्ध राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारखाना बचाव पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. आज सकाळपासून सभासद मतदारांनी व कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गर्दी केली होती. आठ दिवसांपासून आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आज सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य स्पष्ट झाले.

Saurab Shinde Jallosh
साहेब, तुम्हीच मला आमदार करू शकता : दीपक पवार  

जावळी तालुक्यातील राजकीय वातावरण यानिमित्ताने ढवळून निघाले होते. आज मतमोजणी झाल्यानंतर मतदारांनी आपला कौल सौरभ शिंदे यांच्या बाजूने दिल्याचे हे सिध्द झाले. जसजसा निकाल जाहीर होत गेला तसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत २१०-०... सौरभबाबा हिरो..., संस्थापक पॅनेलचा विजय असो.., आशी घोषणाबाजी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com