सांगली : ''मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, आरएसएस-बीजेपीची विचारधारा हा माझ्या आयुष्यांचा अविभाज्य भाग आहे. माझ्या विचारधारेशी मी आयुष्यात कधीही तडजोड करणार नाही,'' असे केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी आज सांगली येथे एका मुलाखतीत सांगितले.
''माझे मित्र दिवगंत श्रीकांत जिचकर हे मला एके दिवशी म्हणाले की तु खूप चांगला आहे, पण तुझ्या पार्टीला भविष्य नाही, तू पार्टी बदल, पण मी त्यांना सांगितले की ''मी विहीरीत जीव देईल पण पार्टी बदलणार नाही,''
गडकरी म्हणाले ''सध्या भाजपची सत्ता हे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. माझी विचारधारा, पक्ष काहीही असला तरी हा समाज माझा आहे, समाजकारणासाठी राजकारण करणे हे सर्वाच्या हिताचे आहे,''
'मंत्र्यांना अडचणीत कोण आणते,' याचे उत्तर आज नितीन गडकरींनी दिले. ते म्हणाले, ''तीन जण हे मंत्र्याला अडचणीत आणतात, ते म्हणजे बायको, मेहुणा आणि तिसरे म्हणजे चहापेक्षा किटली गरम अर्थात मंत्र्यांचे पीए,'' गडकरींचे हे उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. विदर्भात साखर कारखाने सुरु केले याबाबत गडकरी म्हणाले, ''ज्यांनी मागच्या जन्मी पाप केले त्यांनीच साखर कारखाने व वर्तमानपत्र काढावे,''
''विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे मूळ पाणी आहे. आर. आर. पाटील मला नेहमी सांगायचं जरा, आटपाडी , सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग पाहा. बळीराजा योजना तयार करून पश्चिम महाराष्ट्र करता 6 हजार कोटी मंजूर केले होते, आज तो भाग पाणीदार झाला आहे. गणपतराव देशमुख सांगोला पाणी देण्यासाठी मागणी करत होते, ते ही मागणी पूर्ण केली. शेतकरी केवळ अनदाता नाही तर ऊर्जादाता बनला पाहिजे,'' असे गडकरी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.