राष्ट्रवादी नगरसेवकाच्या आरोपानंतर अस्वस्थ महेश कोठे थेट रुग्णालयात ॲडमिट!

या बैठकीत झालेल्या आरोपानंतर कोठे यांच्या छातीत दुःखू लागले. तपासणीसाठी ते गंगामाई रुग्णालयाकडे रवाना झाले.
Mahesh Kothe
Mahesh KotheSarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाची लाट असताना आम्ही सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अस्तित्व टिकविले. महापालिकेच्या प्रभाग रचनेत मात्र माझ्या प्रभागाची तोडफोड केली. प्रभागरचनेतील हा सर्व घोळ तुमच्यामुळेच झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांच्यावर केल्याची चर्चा आज (ता. १० फेब्रुवारी) होती. बैठकीतील त्या आरोपानंतर अस्वस्थ कोठे यांनी थेट रुग्णालयात धाव घेतली. (Unsettled Mahesh Kothe admitted directly to hospital after allegations of NCP corporator)

नगरसेवकाचा हा आरोप सहन न झाल्याने कोठे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतल्याची कुजबूज शहर राष्ट्रवादीत रंगली होती. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर आणि कोठे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादीत कमालीची शांतता पसरली आहे. या बैठकीत नक्की काय घडले? याबद्दल बैठकीत उपस्थित असलेल्या नेत्यांनीही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणेच पसंत केले. सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा महापौर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोलापूर शहर राष्ट्रवादीसाठी खास सांगली येथील शेखर माने यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

Mahesh Kothe
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी शिक्षकाला बनविले उपसभापती!

समन्वयक माने हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात आणि सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालयात त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या आरोपानंतर कोठे यांच्या छातीत दुःखू लागले. तपासणीसाठी ते गंगामाई रुग्णालयाकडे रवाना झाले. हायपर टेन्शन व ब्लड प्रेशर कमी झाल्याचे समजले. खबरदारीची उपाययोजना म्हणून महेश कोठे यांना मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. रात्री कोठे यांनी प्रकृती नॉर्मल झाली होती.

Mahesh Kothe
महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार; अजितदादा त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

माझी तब्येत व्यवस्थित काळजीचे कारण नाही : कोठे

सततच्या प्रवासामुळे दगदग जास्त झाली होती. ट्रेस वाढला होता. आज राष्ट्रवादीची बैठक होती. तपासणीसाठी मी गंगामाई हॉस्पिटला गेलो होतो. तेथून मला 48 तास डॉक्‍टरांच्या निगराणीखाली राहण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे मी मार्कंडेय रुग्णालात दाखल झालो आहे. आता माझी तब्येत व्यवस्थित असून काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com