वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक

एन.आर. शेळके (Upper Collector NR Shelke) असं अटक करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने एन. आर. शेळकेला औरंगाबाद येथून अटक केली आहे. शेळकेला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
NR Shelke
NR Shelkesarkarnama
Published on
Updated on

बीड : बीड जिल्ह्यातील जमीन घोटाळ्यात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील जमीन घोटाळयात, बडतर्फ करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. एन.आर. शेळके (Upper Collector NR Shelke) असं अटक करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव आहे. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने एन. आर. शेळकेला औरंगाबाद येथून अटक केली आहे. शेळकेला यापूर्वीच सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

वक्फ बोर्डाची जमीन मदतमाश जाहीर करुन, भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलिसात दाखल आहे. या प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला आहे . शेळके याच्यावर सेवेत असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ जमीनीच्या (Wakk Board) घोटाळयातील अनेक आदेश शेळकेच्या (NR Shelke) सहीचे असल्याचे सांगितले जात आहे.

NR Shelke
'रावण गँग'च्या चौघांना कराडमध्ये सिनेस्टाईल पकडलं

बीड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना, शेळकेला लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यात त्याला बडतर्फ करण्यात आले होते. दरम्यान जमीन घोटाळ्यातील बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात आतापर्यंत १५ आरोपीसमोर आले आहेत. आणखी एक उपजिल्हाधिकारी देखील (Beed) पोलिसांच्या रडारवर आहे. आष्टी तालुक्यातील देवस्थान जमीन घोटाळ्यात आरोपींची अटक होत नसल्याची तक्रार आमदार बाळासाहेब आजबे (MLA Balasaheb Ajabe) यांनी थेट पोलीस महासंचालकांकडे केल्यानंतर आता या प्रकरणात ही कारवाई सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com