'श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज थांबवण्यासाठी उपाययोजनाचे तातडीने निर्देश'

Pandharpur|Vitthal-Rukhmini Mandir : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज होत आहे.
Nilam Gorhe, Vitthal Rukhmini Mandir
Nilam Gorhe, Vitthal Rukhmini MandirSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी (Vitthal-Rukhmini Mandir) मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मूर्तीचे संवर्धन आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर या दोन्ही बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल येत्या 5 मे पर्यंत सादर करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी आज (ता.14 एप्रिल) दिले

Nilam Gorhe, Vitthal Rukhmini Mandir
पंढरपूरच्या विठुरायाच्या मूर्तीवर करणार वज्रलेप 

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भांत डॉ. निलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, मंदिर समितीचे औसेकर महाराज, पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी श्रीकांत मिश्रा, सहायक संचालक विलास वाहने, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाची झीज तातडीने थांबवून मूर्तीचे संवर्धन, जतन करण्यासाठी प्राध्यान्य द्यावे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करूनच अहवाल सादर करावा. या अहवालातील महत्वाच्या बाबी वारकरी संप्रदायाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या भावनांचा आदर करावा, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिली. यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीने समन्वयाने बैठक घ्यावी. या बैठकीनंतर मंदिर आणि परिसरातील आर्द्रता कमी करण्यासाठी पुरातत्व विभागाने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंलबजावणीसंदर्भात सर्वानुमते निर्णय घेणे सोयीचे होईल.

Nilam Gorhe, Vitthal Rukhmini Mandir
Video : दीक्षाभूमीनंतर ‘हे’ होणार महत्वाचे स्थळ, पण सरकारचे दुर्लक्ष...

आर्द्रता कमी करण्यासाठी मंदिरातील मार्बल काढण्याबाबत योग्य, निर्दोष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी घ्यावी. वज्रलेपाची झीज थांबविण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इतर मंदिरात केलेल्या उपाययोजना, मंदिर समित्यांचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर येथील मंदिराची लवकरच स्वतः पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्याही त्यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Nilam Gorhe, Vitthal Rukhmini Mandir
सुजात आंबेडकरांना सुप्रिया सुळेंसह राज्यातील आणि देशातील 'हे' नेते आवडतात...

या विषयाची तातडीने दखल घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी डॉ. गोऱ्हे यांचे आभार मानले. पुरातत्व खात्याच्या अहवालानंतर योग्य त्या उपाय योजनाबाबत डॉ. गोऱ्हे अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची विनंती यावेळी मंदिर समितीच्या वतीने त्यांनी डॉ. गोऱ्हे यांना केली. तसेच, पंढरपूर येथे भेट देण्याचे निमंत्रणही यावेळी देण्यात आले. डॉ. गोऱ्हे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पंढरपूरला भेट देण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com