Mangalveda News : आमदार समाधान आवताडे पाणीप्रश्नावरून आपल्याच सरकारवर बरसले

विठ्ठल मंदिर समिती कर्मचाऱ्यांना महागाई व घरभत्ता द्यावा
Samadhan Avatade
Samadhan AvatadeSarkarnama

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर-मंगळवेढ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवाताडे (Samadhan Avtade) हे पाणीप्रश्नावर अधिवेशनात भलतेच आक्रमक दिसून आले. ते याच प्रश्नावर आपल्याच सरकारवर बरसले. पौट साठवण तलाव, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे काम हाती घेणे. तसेच, म्हैसाळ योजनेतून शिरनांदगी, मारोळी, लवंगी तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसह बेरोजगार व पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आवताडे यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठविला. हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली. (Various issues including water were raised in the Legislative Assembly by MLA Samadhan Avtade)

अर्थसंकल्पीय अधिवेशानातील पहिल्या आठवड्यात आवताडे यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळाली नव्हती. गेल्या दोन दिवसांत अनेक रखडलेल्या प्रश्नावर आमदार आवताडे यांनी आवाज उठविला, त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून धूळखात पडलेल्या पौठ साठवण तलावाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला. या तलावाचे काम झाल्यास १७ गावांतील सुमारे १५०९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या कामास २००० मध्ये प्रशासकीय, तर २००९ मध्ये पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वेळेत प्रकल्प सुरू न होऊ शकल्यामुळे या प्रकल्पाच्या रकमेत वाढ झाली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पास नव्याने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.

Samadhan Avatade
Supreme Court : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल; पण सरकार टिकेल : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलाने वर्तविला अंदाज

तालुक्यातील २४ दुष्काळी गावांसाठीची मंगळवेढा उपसा सिंचन योजना अद्याप मार्गी न लागल्यामुळे ही योजना मृगजळ आहे, अशी भावना माझ्यासह मतदारसंघातील जनतेची झाली आहे. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडल्यानंतर जलसंपदामंत्री देवेद्र फडणवीस यांनी या योजनेचे काम त्वरित सुरू करण्यात येईल, असे असे आश्वासन दिले होते. या मार्चअखेर हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन मान्यता द्यावी, अशी मागणीही आमदारांनी केली.

तालुक्यातील दक्षिण भागातील शिरनांदगी, मारोळी तलावात म्हैसाळच्या मंगळवेढा वितरीका क्र. २ कालव्यातून वेगळी पाईपलाईन काढून पाणी सोडणे सोपे होऊ शकते. पडोळकरवाडी तलाव जत शाखा कालव्याजवळ व लवंगी तलाव उमदी वितरीकेपासून जवळ आहे. या कालव्यापासून वेगळी पाईप लाईन केल्यास हे तलाव भरू शकतात. म्हैसाळ योजना प्रकल्पातून हे तलाव भरण्यासाठी अतिरिक्त पाण्याची व निधीची तरतूद करावी, अशी मागणीही आवताडेंनी केली.

Samadhan Avatade
Assembly Session : ...अन्‌ मुख्यमंत्री शिंदे धावतच विधानसभेत पोचले!

विठ्ठल मंदिर समिती कर्मचाऱ्यांना महागाई व घरभत्ता द्यावा

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ७ ते ३० वर्षे झालेल्या आहेत. तथापि, या कर्मचाऱ्यांना शासकीय निर्णयाप्रमाणे पूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात येत नाही. त्यामुळे त्यांना तुटपुंज्या पगारात काम करावे लागत आहे. वाढती महागाई व तुटपुंज्या वेतनामुळे कर्मचाऱ्यांना घरखर्च भागविणे अतिशय जिकीरीचे होत आहे, त्यामुळे शासकीय निर्णयाप्रमाणे मंदिर समिती कर्मचाऱ्यांना संपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून धर्मादाय आयुक्त, मुंबई यांनी शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. शासकीय निर्णयाप्रमाणे मंदिर समिती कर्मचाऱ्यांना संपूर्ण महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्याची मागणी आवताडे यांनी केली.

Samadhan Avatade
Assembly Session : गोऱ्हेंची नार्वेकरांवर टिपण्णी : विधानसभेत आशिष शेलारांचा वार; तर भास्कर जाधवांचा पलटवार

एमआयडीसीसाठी समिती नेमा

मतदारसंघात एमआयडीसी स्थापनेच्या दृष्टीकोनातून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या मागणीची त्वरित दखल घेऊन प्रत्यक्षात दालनात बैठक घेऊन स्थळपाहणी व निश्चिती करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबद्दल आवताडे यांनी सामंतांचे विशेष अभिनंदन केले. विधानसभेतील चर्चेद्वारे आवताडे यांनी एमआयडीसी अनुषंगाने उच्चाधिकार समितीची त्वरित स्थापना करून ती उभारण्याची कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com