शशीकांत शिंदेंची जावळीत दादागिरी; अरेरावीला जशास तसे उत्तर देणार....

श्री. मानकुमरे Mankumre म्हणाले, शशिकांत शिंदे shashikant shinde यांचा पराभव अटळ असून त्यांच्याकडे अनेक पदे आहेत. त्यांनी अजूनही मोठे व्हावे पण जावळी jawali taluka तालुक्यात आता त्यांनी लक्ष घालू नये.
Vasantrao Mankumre, Shashikant shinde
Vasantrao Mankumre, Shashikant shindesarkarnama
Published on
Updated on

कुडाळ : ज्ञानदेव रांजणे यांचा विजय निश्चित असून, आमदार शशिकांत शिंदे यांनी आता जावळीत येऊन दादागिरीचा धंदा बंद करावा. यापुढे त्यांनी अरेरावी केली तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव घेत थेट आव्हान दिले आहे.

जिल्हा बँकेच्या जावळी सोसायटी मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आमदार शशिकांत शिंदे गट व मानकुमरे गट एकमेकांविरोधात भिडले होते. मतदानानंतर त्याचा समाचार वसंतराव मानकुमरे यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी पत्रकारांशी बोलताना घेतला. श्री. मानकुमरे म्हणाले, शशिकांत शिंदे यांचा पराभव अटळ असून त्यांच्याकडे अनेक पदे आहेत. त्यांनी अजूनही मोठे व्हावे पण, जावळी तालुक्यात आता त्यांनी लक्ष घालू नये. आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी जशास तसे उत्तर देऊ.

Vasantrao Mankumre, Shashikant shinde
सातारा जिल्हा बँकेसाठी भोसले गट सहकार मंत्र्यांबरोबरच; पाहा व्हिडीओ

शशिकांत शिंदे यांनी आता दादागिरीचा धंदा बंद करावा, असा इशारा देत शिंदे यांची अरेरावी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह निंबाळकर या दिग्ग्ज नेत्यांनी माघार घेतली असेल तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माघार घेतली असती तर काय बिघडले असते. शिंदे यांनी तालुक्यामध्ये येऊन धिंगाणा घातला, गुंड आणले, दहशत केली. ह्या सर्व प्रकाराला आता जावळी तालुक्याची जनता कंटाळली आहे.

Vasantrao Mankumre, Shashikant shinde
आमदार जयकुमार गोरेंचा धक्का कोणाला; माणच्या निकालाकडे लक्ष

हीच शशिकांत शिंदे यांची स्टाईल आम्हाला संपवायची होती. म्हणूनच एका सर्वसामान्य माणसाला जिल्हा बँकेची उमेदवारी देऊन शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उभे केले हाच लोकशाहीचा विजय आहे. यापुढे शिंदे यांनी जावळीत कितीही लक्ष घातले तरी आम्हीही त्याला सामोरे जाऊ, जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे सज्जन आमदार आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षात जावळी तालुक्यात कधीही अशांतता निर्माण केली नाही, दहशत माजवली नाही.

Vasantrao Mankumre, Shashikant shinde
शशीकांत शिंदेंसाठी शरद पवारांचा शिवेंद्रसिंहराजे, मकरंद पाटलांना फोन...

मात्र, शशिकांत शिंदे निवडणुकीच्या माध्यमातून जावळी तालुक्यात येतात आणि वातावरण गढूळ करतात. हे आता यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असेही मानकुमरे यांनी स्पष्ट केले. यापुढे शशिकांत शिंदे यांनी कितीही लक्ष घालण्याचा प्रयत्न केला तरी, जावळीचे आमदार म्हणून शिवेंद्रसिंहराजेच लोकप्रतिनिधी म्हणून राहतील, असे त्यांनी ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com