कोल्हापूर पोटनिवडणुकीतील विजय धर्मांध राजकारणाला चपराक... शशीकांत शिंदे

कोल्हापूरचे Kolhapur पालकमंत्री Guardian Minister सतेज पाटील Satej Patil यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने Mahavikas Aghadi भाजपचा BJP करेक्ट कार्यक्रम केला आहे.
MLC Shashikant Shinde, Jayshree Jadhav
MLC Shashikant Shinde, Jayshree Jadhavsarkarnama

सातारा : ''उत्तर कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या श्रीमती जयश्रीताई जाधव यांचा विजय ही धर्मांध राजकारणाला खूप मोठी चपराक आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या बळकटीकरणासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी दिली आहे.

अटीतटीची आणि चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जयश्री जाधव यांना एकुण ९६ हजार २२६ मते मिळाली. तर विरोधी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मते मिळाली. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.

MLC Shashikant Shinde, Jayshree Jadhav
सतेज पाटील भावूक : "कसबा-बावडाकरांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं"

महाविकास आघाडीने एकजूट दाखवून भाजपची धोबीपछाड केली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्या विजयावर साताऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार शशीकांत शिंदे म्हणाले, ''कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या जयश्रीताई जाधव यांचा विजय ही धर्मांध राजकारणाला खूप मोठी चपराक आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या बळकटीकरणासाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. या लढाईत एकजुटीने लढलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. तसेच जयश्रीताईंचे ही मनापासून अभिनंदन करतो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com