Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama

शिंदे अन् खोतकरांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल; दानवे म्हणतात भेट गुप्त...

रावसाहेब दानवे (Rabsaheb Danve) यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
Published on

कोल्हापूर : राजेशाही आता संपली आहे, राजा आता मतपेटीतून जन्माला येतो पोटातून नाही. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी राजे होते, असा टोला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Rabsaheb Danve) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला. कोल्हापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना दानवे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

अर्जुन खोतकर यांच्या भेटीबद्दलही त्यांनी खुलासा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि माझी भेट अचानक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एकत्र बसवले, आमच्या वादाच कारण विचारले. दोघेही बोललो, यापूर्वी झाल ते विसरायचे आणि पुढे चालायचे ठरले. शिंदे यांनी आम्हा दोघांना साखर चारली आणि आम्ही एकत्र काम करायचा निर्णय घेतला असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Raosaheb Danve
सीएम, डीसीएम यांच्यासाठी भरघोस अधिकारी-कर्मचारी

अर्जुन खोतकर आणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ कोणी काढला यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यावर रावसाहबे दानवे म्हणाले, आमच्या सारखे नेते भेटतात तेव्हा, फोटो कोणी काढला, व्हिडीओ कोणी काढला, हे सागू शकत नाही. कोणिही कोपऱ्यातून कॅामेरा सुरु करतो आणि व्हिडीओ काढतो. ती बैठक गुप्त नव्हतीच त्यामुळे आणि सगळ्यांनी फोटो काढले, व्हिडीओही काढले, असे दानवे म्हणाले.

Raosaheb Danve
संवादयात्रा सुरू असतानाच ठाकरेंच्या युवासेनेला आणखी मोठे खिंडार !

दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात आमच्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या वडिलांचा फोटो लावा आणि निवडणूक लढवा. शिवसेनेचे प्रमुख हे माझे वडील होते. त्यामुळे यावर आमचाच अधिकार. असे ते सांगतात. मात्र, आता राजेशाही नाही. शिवसेनाप्रमुख हे आमच्यासाठी राजे होते. मात्र, राजाचाच मुलगा राजा होईल असे नाही. आता राजा मतपेटीतून जन्माला येतो, पोटातून नाही, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com