Kolhapur Politics : नेत्यांनी शब्द फिरवला, जनसुराज्यात दुफळी; पाडळीच्या सरपंच पदाचं नेमकं झालं?

Padali Sarpanch Election : गेल्या सहा महिन्यात गावातील पक्षातील अंतर्गत वादातून स्थानिक नेत्यांनी सुजाता पाटील यांना सरपंचपद देण्यास विरोध केला.
Padali Sarpanch
Padali SarpanchSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : हातकणंगले तालुक्यातील पाडळी येथे जनसुराज्यची एकहाती सत्ता आहे. मात्र स्थानिक नेत्यांतील दुफळीमुळे सरपंचपदाची निवडणूक होऊन ऐनवेळी अर्ज भरलेल्या डॉ. विभा पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली.

आता नेत्यांनी शब्द देऊनही सुजाता पाटील यांना सरपंचपदापासून दूर रहावे लागले. अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी अमीत लाड होते.

2021 च्या निवडणुकीत येथील ग्रामपंचायतीवर सर्व 11 सदस्य जनसुराज्य शक्ती पक्षाचे निवडून आले होते. येथील सरपंचपद सर्वसाधारण महिला पदासाठी राखीव असल्याने सुरवातीला डॉ. विभावरी पाटील यांना सरपंचपदाची संधी मिळाली.

अडीच वर्षांनंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे डाॅ. पाटील यांनी राजीनामा दिला. यानंतर याच पक्षातील ऐश्वर्या पाटील व सुजाता पाटील या सरपंच पदासाठी इच्छुक होत्या. हा वाद कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने व पक्षप्रमुख आमदार विनय कोरे Vinay Kore यांच्यापर्यंत पोहचला. वाद न मिटल्याने अखेर सरपंच निवड रद्द करावी लागली.

दरम्यान, माने व कोरे यांनी हातमिळवणी केली आणि ऐश्वर्या पाटील बिनविरोध सरपंच झाल्या. त्यानंतर सुजाता पाटील यांना सरपंच करण्याचा शब्द दिला. पण गेल्या सहा महिन्यात गावातील पक्षातील अंतर्गत वादातून स्थानिक नेत्यांनी सुजाता पाटील यांना सरपंचपद देण्यास विरोध केला. मात्र विजयसिंह माने व पक्षप्रमुख विनय कोरे यांनी सुजाता पाटील यांना सरपंचपदी निवड करावी असा आदेश गावातील स्थानिक नेत्यांना दिला.

Padali Sarpanch
Congress Vs NCP SP : सोलापूरात आघाडीत 'या' जागांवरून रस्सीखेच; पवार-गांधींच्या निर्णयाकडे लक्ष

अखेरच्या क्षणी स्थानिक नेत्यांनी डॉ. विभावरी पाटील यांचा अर्ज भरला. त्यामुळे मतदान घेण्यात आले. डाॅ. विभा पाटील यांना पाच मते तर विरोधातील सुजाता पाटील यांना तीन मते पडली. उर्वरीत तीन सदस्य अनुपस्थित राहिल्याने विभा पाटील यांना सरपंच म्हणून मंडळ अधिकारी अमित लाड यांनी घोषित केले. या घटनेने पाडळीच्या जनसुराज्य पक्षात सरळ सरळ दोन गट पडल्याचे सिध्द झाले.

(Edited by Sunil Dhumal)

Padali Sarpanch
Shishupal Patle : विदर्भात भाजपला पुन्हा धक्का; माजी खासदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com