डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी काल ( शनिवारी ) मुंबईतील सभेत हिंदुत्वाचे पालन करण्याचा संदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप व हिंदुत्ववादी संघटनांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. भाजपचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. ( Vinay Sahastrabuddhe said, Raj Thackeray's role will remain favorable for Hindutva ... )
भाजप नेते खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते डोंबिवली मधील टिळक शाळेत 'भाषावर्धीनी' भाषा केंद्राचे तसेच कै. आबासाहेब पटवारी कक्षाचे उदघाटन झाले. या प्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सहस्त्रबुद्धे म्हणाले, राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वासाठी अनुकूल राहिले आहे, त्यांनी हिंदुत्वावर भर दिला असेल तर हिंदुत्वाच्या भल्यासाठीच आहे, असे वक्तव्य खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, मशिदीवरील भोंग्या संदर्भात राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत बोलताना खऱ्या अर्थाने सलोखा आणि सामंजस्य नंदायाचे असेल तर कुणालाही विशेष अधिकार देता कामा नये, या अर्थाने या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. राज ठाकरे हे राजकीय नेते आहेत. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांचा मार्ग निवडतील, अटकळबाजीच्या माध्यमातून पतंग उडवन्याला काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.