विशाल फटेला कोर्टाचा दणका : आई आणि पत्नीचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

संशयित आरोपी म्हणून विशाल फटे आणि त्याचे वडील अंबादास फटे या  दोघांनाच बार्शी पोलिसांनी आजपर्यंत अटक केली आहे.
Vishal phate case News, Vishal Phate Barshi scam News
Vishal phate case News, Vishal Phate Barshi scam NewsSarkarnama
Published on
Updated on

बार्शी (जि. सोलापूर) ः बार्शीसह (Barshi) संपूर्ण राज्यातील नागरिकांना सुमारे ४० कोटींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे (Vishal phate) याला बार्शीच्या विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. या प्रकरणातील संशयित असलेले त्याची पत्नी आणि आईचा अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी न्यायालयाने फेटाळून लावला आहे, त्यामुळे फटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Vishal Fate Barshi scam : Pre-arrest bail application of mother and wife rejected)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रलोभने दाखवून विशाल फटे यांनी बार्शीसह राज्यभरातील नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. त्यासाठी त्याने बार्शीसह पुण्यातही कार्यालये थाटली होती. यामध्ये अनेक बड्यांची नावेही आहेत. या फसवणूक प्रकरणी विशाल फटे याच्यावर जानेवारी २०२२ मध्ये बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह त्याची पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. आतापर्यंत १४० गुंतवणूकदारांची सुमारे ४० कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी व आईचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एल. एस. चव्हाण यांनी फेटाळला.(Vishal phate case News Updates)

Vishal phate case News, Vishal Phate Barshi scam News
ठाकरे सरकार पडतंय, याचं दुःख नाही; पण... : शेट्टींनी दिला भाजपला हा इशारा

संशयित आरोपी म्हणून विशाल फटे आणि त्याचे वडील अंबादास फटे या  दोघांनाच पोलिसांनी आजपर्यंत अटक केली आहे. विशालची पत्नी  राधिका फटे, त्याची आई अलका फटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात ‘संशयित आरोपी महिलांच्या खात्यावरुन कसलाही व्यवहार झालेला नाही. त्यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा,’ अशी मागणी केली होती.

Vishal phate case News, Vishal Phate Barshi scam News
थेट पवारांना आव्हान देणाऱ्या राहुल कुलांच्या मंत्रीपदाची दौंडमध्ये चर्चा!

दुसरीकडे, संशयित महिला आरोपी ही मागील चार ते पाच महिन्यांपासून फरार आहे. पोलिस कोठडीशिवाय या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होणार नाही. फसवणुकीतील रक्कमेची व्याप्ती सुमारे चाळीस कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच, आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी सेबीची पूर्व परवानगीही घेतलेली नाही, असा युक्तिवाद गुंतवणूकदारांच्या वतीने न्यायालयापुढे करण्यात आला. गुंतवणुकदारांच्या वतीने तपास यंत्रणा करत असलेल्या कामावरही सशंय व्यक्त करण्यात आला. फिर्यादी विधिज्ञांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अलका व राधिका फटे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

Vishal phate case News, Vishal Phate Barshi scam News
शिंदेंच्या मनधरणीसाठी गुवाहाटीत गेलेल्या उपजिल्हाप्रमुखास पोलिसांनी घेतले ताब्यात

गुंतवणूकदारांच्या वतीने ॲड. सचिन झालटे, ॲड. श्याम झालटे, विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी युक्तिवाद केला, तर संशयित  आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत एडके यांनी युक्तिवाद केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com