बायको अन् दीड वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या करणार होतो! विशाल फटेनंच दिली कबुली

कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) अखेर जगासमोर आला आहे.
Vishal Phate
Vishal Phate Sarkarnama
Published on
Updated on

बार्शी : मागील काही दिवसांपासून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारा विशाल फटे (Vishal Phate) याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. फटे हा फरार असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांनी (Police) विशेष तपास पथक तैनात करण्यात आले आहे. आज अखेर फटे हा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आला. त्याने आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले असून, पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

फटे याने म्हटले आहे की, माझ्यावर झालेल्या चिखलफेकीमुळे मी बायको मुलीसह आत्महत्या करणार होतो. लोक मला असे करतील, तसे करतील, अशी भीती मला होती. या बदनामीमुळे जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटत होते. बायको आणि दीड वर्षांच्या मुलीला घेऊन मी आत्महत्येचा विचार करीत होतो. माझ्या वडिलांचे नाव फक्त ऑन रेकॉर्ड कंपनीत आहे. त्यांना त्यातून एकही पैसा मिळाला नसून, त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. आता फाशी झाली तरी मी त्याचा स्वीकार करेन.

सांगलीवाला दुबईत जाऊन बसला

आता सगळेच मला वाईट म्हणत आहेत. माझ्यापेक्षा किती मोठी धेंडे आहेत. सांगलीवाला त्याच्यावर एकही केस नाही. त्याने पैसे गोळा केले दुबईला गेला आणि तिथे जाऊन बिझनेस केला. आज संध्याकाळी मी पोलीस ठाण्यात हजर होणार आहे. मी कुणाचाही एक पैसा बुडवणार नाही. वेळ पडल्यास भीक मागून मी पैसे देईन, याची मी 101 टक्के गॅरंटी देतो. हे सगळे मी जाणूनबुजून केले नाही. लोकांनी माझ्यावर चिखलफेक केली. माझ्या परिवाराची बदनामी केली, असे फटेने सांगितले.

Vishal Phate
फरार विशाल फटे प्रकटला अन् म्हणाला, पोलिसांसमोर शरण येणार!

पोलिसांना माझी मालमत्ता गोठवावी

दहा ते बारा कोटी रुपयांचा आकडा असताना 200 कोटी रुपयांचा आकडा त्यांनी आणला. कुणीही माझ्यासाठी जमीन गहाण ठेवलेली नाही. माझ्यामुळे घरे नसलेल्या 40 जणांची घरे झाली. सायकल नसलेले लोक आता माझ्यामुळे चारचाकी घेऊन फिरत आहेत. मी स्वत;हून पोलिसांसमोर शरण येत आहे. पोलिसांनी माझी मालमत्ता गोठवावी. त्यांना योग्य वाटेल ती कारवाई त्यांनी करावी, असेही तो म्हणाला.

Vishal Phate
फटेचा असाही प्रवास : गोव्यात हमाली ते बार्शीत येऊन करोडोंचा चुना

सुमारे 18 ते 19 कोटींच्या फसवणुकीचा अंदाज

फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादित राहिला नसून, इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत 76 जणांनी तक्रार दिली असून, फसवुणकीचा आकडा 18 ते 19 कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. विशाले फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे. यावर आता फटेनेच समोर येत उत्तर दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com