karad : आम्ही उघडपणे दर्शनाला जातो.. काही लोक लपुन छपुन जातात : मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, संजय राऊत फार महान नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलु. हात दाखवण्याची आवश्यकता मला नाही.
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath Shindesarkarnama

कऱ्हाड : आम्ही आमचे सर्व ५० सहकारी आमदार घेवुन गुवाहाटीला उद्या जाणार आहोत. तेथील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले आहे. आम्ही उघडपणे दर्शनाला जातो. त्यात काय बंदी आहे. काही लोक लपुन छपुन जातात. या राज्यात, देशात शंकराचे, शिर्डीच्या साईबाबांचे आणि देवाचे दर्शन घेणे गु्न्हा आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर उपस्थित केला.

"ज्यांच्या स्वत:वर विश्वास नाही, अशी माणसं जोतिषांकडे, मात्रिकांकडे जात असतात, अघोरी विद्यांचा आधार घेत असतात. जे अशा अघोरी विद्यांचा आधार घेतात, त्यांचा अंतही अघोरी होईल, महाराष्ट्रातील जनताच त्यांचे भविष्य ठरविणार आहे," असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावेळी लगावला त्यावर प्रतिक्रीया देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे कऱ्हाड दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, संजय राऊत फार महान नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी काय बोलु. हात दाखवण्याची आवश्यकता मला नाही.

Sanjay Raut, Eknath Shinde
Karad : यशवंतरावांनी औद्योगिक, कृषी विकास साधला...एकनाथ शिंदे

हाताच्या रेषा बदलण्याची ताकद मनगटात असावी लागते. ते बळ बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी आम्हाला दिले आहे. ३० जुनला आम्ही ती ताकद दाखवली आहे. ते राज्याने, देशाने पाहिले आहे. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आम्ही उघडपणे दर्शनाला जातो. त्यात काय बंदी आहे. काही लोक लपुन छपुन जातात, त्यांना विचारा आम्ही दिवसाढवळ्या जातो. आम्ही गेलो त्यावेळी पत्रकार तेथे होते. या राज्यात, देशात शंकराचे, शिर्डीच्या साईबाबांचे आणि देवाचे दर्शन घेणे गु्न्हा आहे का ?

Sanjay Raut, Eknath Shinde
Patan : शंभूराज देसाई भडकले; म्हणाले, कोत्या मनाच्या लोकांना ते आवडले नसावे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com