पाठिंबा द्यायची सवय आता बंद करावी लागेल; राष्ट्रवादीच्या भूमिकेनं आघाडीत अस्वस्थता

NCP | Solapur | Jayant Patil : जयंत पाटील यांनीच सुतोवाच केल्याने आले टेन्शन...
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

सांगोला : आपल्या तालुक्यात कायमच इतरांना पाठिंबा देण्याची सवय लागली आहे. पण आता ही सवय बंद करायला हवी. तालुक्याला जे-जे हवे आहे, अत्यावश्यक आहेत ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. परंतु तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटना सक्षम, मजबूत करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा रामकृष्ण व्हीला सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले, तालुक्यातील टेंभू-म्हैसाळ योजनचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करण्यात येईल. दीपक आबांनी तालुक्यातील कामांबाबत जी निवेदन दिली आहेत, त्याबाबत कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिवेशन काळात बैठक लावून सर्व कामे पूर्ण करण्यासाठी व योजनेचे प्रत्येक गावाला पाणी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. परंतु तालुक्यातील राष्ट्रावादी काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी कोणाला तरी पाठिंबा द्यायची सवय बंद करुन संघटनेचा प्रभाव कसा वाढेल याकडे प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे, असेही ते म्हणाले.

Jayant Patil
"राजन पाटलांचं महत्व कमी होणार नाही" : जयंत पाटलांनी दिला शब्द

तसेच आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकांमध्ये ताकदीने लढा आणि चांगले यश मिळवा. या भागातील शिरापूर, आष्टी योजना २०२३ आधी पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जेवढा निधी लागेल तेवढा देण्याचे काम करू. तसेच इतरही योजना पूर्ण केल्या जातील. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्षम करा, असेही कार्यकर्त्यांना आवाहन करताना जयंत पाटील म्हणाले. मात्र जयंत पाटील यांच्या या वक्तव्याचे राज्यातील राजकारणावर परिणाम होणार का? या विचाराने आघाडीच्या नेत्यांमध्ये अस्वस्था पसरली आहे.

Jayant Patil
दिशा सॅलियन प्रकरणात सचिन वाझेची एन्ट्री, नितेश राणेंनी सांगितला संबंध

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपक साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सांगोलासोबतच काल मोहोळमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा पार पडली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com