NCP Crisis : सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा; 'नाती जपण्यासाठी आम्ही सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला होता...'

Supriya Sule in Solapur : प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने पवारांबाबत बोलत आहेत. त्यानंतरही त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे अशक्य आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Solapur : मी तुम्हाला माझा किंवा शरद पवार यांचा मोबाईल देऊ शकते. आमचे कॉल रेकॉर्ड होतच असतील. आम्ही प्रफुल्ल पटेलांच्या संपर्कात नाही आहोत. आम्ही एका काळात सुवर्णमध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला, पण खालच्या पातळीवर राजकारण सुरू झालंय. तेव्हा त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने पवारांबाबत बोलत आहेत. त्यानंतरही त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे अशक्य आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी पटेल यांचा दावा फेटाळून लावला. (We tried to strike a golden middle to preserve our relationship : Supriya Sule)

खासदार सुप्रिया सुळे या आज (ता. ८ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या संपर्कात असल्याचा दावा फेटाळून लावला. त्या म्हणाल्या की, हा माझा मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये किंवा पवारसाहेबांचाही मोबाईल मी तुम्हाला देऊ शकते. नार्मल, व्हॉट्‌स अॅप आणि टेलिग्राम कॉल कुठल्याही पद्धतीने आमचे कॉल रेकॉर्ड होतच असतील. कुणीही तपासणी करावी. आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या कुठल्याही संपर्कात नाही आहोत.

Supriya Sule
Indapur Politics : इंदापुरात भरणेंना धक्का; मेहुण्याची सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमाला हजेरी

प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने शरद पवारांबाबत बोलत आहेत. त्यानंतरही आम्हाला त्यांच्याशी रोज सुसंवाद ठेवणे अशक्य आहे. ते जरी सांगत असतील की आमच्याशी ते बोलत आहेत, पण आमच्या बाजूने त्यात वास्तव नाही. त्यामुळे याचं उत्तर मी देऊ शकत नाही, प्रफुल्ल पटेलच देऊ शकतात, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय करतंय. मला त्याच्या वेदना होतात. फक्त फडणवीसांचा अपमान होत नाही, तर काँग्रेसच्या विरोधात ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी सतरंज्या उचलल्या, काठ्या खाल्ल्या आणि त्यांच्या कष्टाने १०५ आमदार निवडून आले. त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही, पण फडणवीसांनी काँग्रेस विचारांचा (अजित पवार) मुख्यमंत्री व्हावा, याचा जो आग्रह दाखवला आहे, त्या दिलदारपणाचे आणि त्यागाचे मी स्वागत करते.

Supriya Sule
Israel-Hamas War Impact : पॅलेस्टाईन-इस्राईल युद्धाचा परिणाम भारतावर; सोने-चांदीच्या दरात वाढ

हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार खुनी आहे. नांदेडमधील रुग्णांचा या सरकारने खून केला आहे, असा आरोप सुळे यांनी नांदेड प्रकरणावर केला. महेश कोठे यांच्या उमेदवारीची चर्चा आणि मनोहर सपाटे यांच्या नाराजीच्या चर्चेबाबत सुळे म्हणाल्या की, आमचा पक्ष दडपशाहीचा नाही, तर लोकशाहीचा आहे, त्यामुळे जर मंचावर इच्छा जाहीर करणे, याचं मी स्वागत करते. तसेच सोलापूरच्या स्मार्ट सिटीचा व्हिडिओ करून पाठवा. मी तो अपलोड करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Supriya Sule
Pawar Will Contest in Madha? : माढ्यातून लोकसभेसाठी शरद पवारांच्या नावाचा आग्रह; सुप्रिया सुळे म्हणतात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com