Ahmednagar Politics : ...तर लोखंडेंना पर्याय काय? शिर्डीतून 'बीआरएस' की भाजपकडून श्रीरामपूर?

Sadashiv Lokhande Political Stand : 'राखीव माणसाची धोपटी सोबतच असते,' वक्तव्याने चर्चांना उधाण..
Ahmednagar Politics
Ahmednagar Politics Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : खासदार सदाशिव लोखंडे यांची राजकीय कारकीर्द दीर्घ आणि यशस्वी अशीच राहिली आहे. जामखेड मतदारसंघातून ते भाजपकडून तीन वेळा आमदार आणि शिर्डी लोकसभा जागेवरून शिवसेनेचे दोन वेळा खासदार, अशी मोठी राजकीय घौडदौड लोखंडे यांची आहे. मुंबईमधूनही त्यांनी मनसेकडून नशीब अजमावले, मात्र त्यात ते अपयशी राहिले. 2009 साली घडून आलेला पराभव वगळता 1995 पासून 2019 पर्यंत त्यांनी यशाला गवसणी घातली. (Latest Marathi News)

Ahmednagar Politics
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात ठाकरेंची ताकद वाढणार ; भाऊसाहेब वाकचौरे अन् काँग्रेसचे छल्लारे गुरुवारी शिवबंधन बांधणार

राखीव मतदारसंघ आणि लोखंडे यांच्या यशाचे गणित आहे. भले मतदारसंघ कोणताही असो, हे समीकरण लोखंडे यांनी तयार केले आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीवर दावा करताच लोखंडेंनी, "राखीव माणसाची धोपटी सोबतच असते," असे केलेले वक्तव्य म्हणजे ते आता पुन्हा एकदा पक्ष बदलणार की भाजप सोबतच वेट अँड वॉच करत लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेला श्रीरामपूरसाठी तयारी करणार? याबद्दल उत्सुकता आहे. (Sadashiv Lokhande News)

2014 ला शिर्डीचे तत्कालीन शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सेनेची जाहीर झालेली उमेदवारी नाकारत ऐनवेळी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली. वाकचौरेंनी पक्षांतर केल्याने निवडणुकीला अवघे 17 दिवस बाकी असताना, शिवसेनेकडून उमेदवारीची लॉटरी लोखंडे यांना लागली आणि त्यांनी वाकचौरे यांचा पराभव करत, विजय मिळवला. 2019 ला ते पुन्हा शिर्डीतून शिवसेना खासदार झाले.

Ahmednagar Politics
Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

मतदारसंघात संपर्क नसल्याचा जनतेतून आरोप असल्याने सध्या त्यांच्यावर रोष असल्याचे दिसून येत आहे. त्यात उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे विखे-परिवार वगळता इतर तालुक्यांतून त्यांना विरोधकांचे मोठे आव्हान आहे. अशात रामदास आठवलेंना उमेदवारी मिळाल्यास पुढे राजकीय भवितव्य काय? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

अशा परिस्थितीत सदाशिव लोखंडे यांचा स्वतःसाठी किंवा मुलासाठी श्रीरामपूर राखीव विधानसभा मतदारसंघावर डोळा असल्याचे बोलले जात आहे. मध्यंतरी त्यांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या निवासस्थानी बीआरएसचे खा .बी. पाटील यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेची ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com