Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

Maharashtra Politics : अशी स्थिती राष्ट्रवादीत नाही..
Ajit Pawar and Sharad Pawar
Ajit Pawar and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Baramati : राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही, असे मोठे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शुक्रवारी) केले. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही ? याला फूट कशी म्हणता येईल. जर पक्षातील एक मोठा गट वेगळा झाला तर पक्षात फूट पडते. देशपातळीवर अशी स्थिती राष्ट्रवादीत नाही," असे पवारांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar and Sharad Pawar
Rahul Kul News: भाजप आमदार राहुल कुल यांना मोठा धक्का; भीमा पाटस कारखान्याचे साहित्य जप्त करा, साखर आयुक्तांचा आदेश

"काही लोकांनी पक्ष सोडून वेगळी भूमिका घेतली आहे, तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच पक्षात फूट म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय आहे," असे पवार म्हणाले.

काल (गुरूवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत विधान केले होते. "अजित पवार हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असल्याने त्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे," असे त्या म्हणाल्या होत्या.

Ajit Pawar and Sharad Pawar
BMC Covid Scam : आर्थिक गुन्हे शाखेकडून महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना समन्स ; आज जबाब नोंदवणार

"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत," असा दावाही खासदार सुळे यांनी केला होता. सुळेंच्या वक्तव्याला आज शरद पवारांनी दुजोरा दिला आहे.

शरद पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये अजित पवार यांची सभा होणार आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. यामध्ये कोणीही चिंता करण्याची गरज नाही. कोणीही जाहीर सभा घेऊ शकतो, जनतेला नक्की काय सत्य आहे हे माहिती आहे. जर सभा घेऊन कोणी आपली भूमिका मांडत असेल तर मी त्यांचे स्वागत करतो,"

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com