रशिया, युक्रेन युद्धातून काय साध्य होणार; उदयनराजेंनी व्यक्त केली चिंता

रशिया Rassia आणि युक्रेन Ukraine यांच्यातील युद्धामुळं War संपूर्ण जगाची World चिंता वाढवली आहे. अशातच आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनेही America हात वर केले आहेत.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : युद्ध करणाऱ्या लोकांना कळतं कसं नाहीय. यातून काय साध्य होणार आहे. गेली अनेक वर्ष युद्धच होताहेत; पण यातून काय साध्य झालं, याचाही विचार करणं गरजेचं आहे, अशी चिंता खासदार उदयनराजे भोसले यांनी रशिया आणि युक्रेनमधील युद्धावरून व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत. त्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. अशातच आतापर्यंत युक्रेनच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या अमेरिकेनेही हात वर केले आहेत. युक्रेनमध्ये सैन्य पाठवणार नसल्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. नाटो देशांनीही युक्रेनकडं पाठ फिरवल्याचं दिसतंय. त्यामुळे बलाढ्य रशियापुढं युक्रेनचा एकाकी लढा सुरु आहे. रशियाच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून साताऱ्याचे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

Udayanraje Bhosale
रशिया-युक्रेन वादात भारताची उडी! मोदींनी थेट पुतीन यांना फोन लावला अन् म्हणाले...

उदयनराजे म्हणाले, ''युध्द करणाऱ्या लोकांना कळतं कसं नाहीय. यातून काय साध्य होणार आहे. गेली अनेक वर्ष युद्धच होत आहेत. पण, यातून काय साध्य झालं, याचाही विचार करणं गरजेचं आहे. यापूर्वी डोंगर, नद्या, सीमा होत्याचं की तेव्हा बरं अशी युध्द झाली नाहीत. या युध्दाचा जागतिक पातळीवर मोठा परिणाम होणार आहे आणि ते जगाला परवडणारं नाहीय.''

Udayanraje Bhosale
रशिया युक्रेन संघर्ष चिघळला: राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची मोठी घोषणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप आणण्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, ''मी प्रयत्नशील आहेच; पण काही गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारनं जे भारतीय दोन्ही देशात अडकले आहेत. त्यांना भारतात सुखरूप आणण्यासाठी संपूर्ण पणाला लावलं पाहिजे आणि हे युध्द वेळीच थांबेल अशी आशा करुयात,'' असेही त्यांनी नमुद केले. युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 316 लोक जखमी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com