आमदार रोहित पवार जेव्हा गेले नगर महापालिकेत...

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांची आज आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या आग्रहास्तव अचानकपणे महापालिकेला भेट दिली.
Rohit Pawar & Sangram Jagtap
Rohit Pawar & Sangram JagtapLahu Dalvi

अहमदनगर - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांची आज आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या आग्रहास्तव अचानकपणे महापालिकेला भेट दिली. तेथे जाऊन त्यांनी अहमदनगर महापालिके विषयी आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. When MLA Rohit Pawar went to Municipal Corporation ...

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज नाशिक विभागाची अर्थसंकल्पीय ऑनलाईन बैठक होती. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ ऑनलाईन सहभागी झाले होते. या प्रसंगी आमदार रोहित पवार, आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी अजित पवार यांनी नगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.

Rohit Pawar & Sangram Jagtap
रोहित पवार यांच्या कष्टाचे अजितदादांकडून कौतुक, पाहा व्हिडिओ

ही बैठक झाल्यावर रोहित पवार व संग्राम जगताप बाहेर पडले. त्यावेळी संग्राम जगताप यांनी रोहित पवार यांना अहमदनगर महापालिकेत येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्यानुसार रोहित पवार अहमदनगर महापालिकेत आहे. त्यांनी महापालिकेतील उपमहापौर गणेश भोसले यांच्या दालनात जाऊन महापालिके संदर्भात आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, संजय शेंडगे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, आरिफ शेख, संजय चोपडा, समद खान, निखील वारे आदी उपस्थित होते.

संग्राम जगताप यांनी रोहित पवारांना शहरातील एलईडी पथदिवे प्रकल्पाची माहिती दिली. तसेच काही एलईडी दिवे आणून दाखविले. यावर रोहित पवार यांनी समाधान व्यक्त करत हा प्रकल्प चांगला आहे. असा प्रकल्प मी माझ्या मतदार संघात राबवेल असे सांगितले. भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, मेमोरियल चर्च, ह्युम मेमोरिअल, मेहराबाबा तसेच शहरातील धार्मिक स्थळे आधी सर्व ऐतिहासिक ठिकाणांची मला पाहणी करायची आहे अशी इच्छा आमदार रोहित पवार यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे व्यक्त केली.

Rohit Pawar & Sangram Jagtap
कर्जतचा निकाल म्हणजे विकासाला मत : रोहित पवार, पाहा व्हिडिओ

रोहित पवार म्हणाले, नगर शहरातील भूईकोट किल्ल्या विषयी मी खूप वेळा ऐकले आहे. मला हा किल्ला पाहण्याची इच्छा आहे. पुढील वेळी आल्यावर हा किल्ला आवर्जून पाहिल. या किल्ल्याजवळच्या नगर क्लब हा इंग्रजांच्या काळापासून असल्याचे कळते हा क्लबही मला पहायचा आहे. महापालिकेत प्रकल्प राबवित असताना हा प्रकल्प पथदर्शी ठरेल असा राबवा, अशी सूचनाही त्यांनी उपस्थित नगरसेवकांना केली. रोहित पवार यांनी स्थायी समिती सभापती, उपमहापौर, महापौर व महिला बालकल्याण सभापतींच्या दालनाची पाहणी केली. या दालनांतील नेत्यांचे फोटो पाहून त्यांनी केबीन बदलली की नेत्यांचे फोटो बदलता असे म्हणत कार्यकर्त्यांचीच फिरकी घेतली.

Rohit Pawar & Sangram Jagtap
पब्लिसीटीस्टंटला नव्हे मी शहर विकासाला महत्त्व देतो - आमदार संग्राम जगताप

आम्ही दोघे नवखे

यावेळी आमदार जगताप यांनी माजी नगरसेवक निखील वारे यांचे मूळ गाव जामखेड असल्याचे आवर्जून सांगत आम्ही दोघे नवखे आहोत असे म्हणाले. यावर एकच हशा पिकला. रोहित पवारांनी निखील वारे यांना किती वर्षांपासून नगरसेवक असल्याचे विचारताच वारे यांनी 15 वर्षांपासून नगरसेवक असल्याचे सांगितले. रोहित पवार वारेंना म्हणाले तुम्ही नवखे कसले मातब्बर आहात.

शास्ती माफीची माहिती

अहमदनगर महापालिकेने दोन वेळा शास्ती माफीचा निर्णय घेतली होता. या संदर्भात रोहित पवार यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ही शास्ती माफी कशी लागू होते. त्यातील कायद्याचे बारकावे जाणून घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com