अहमदनगर - चाकण-बीड हा राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे व जामखेड तालुक्यातून जातो. या रस्त्याच्या कामावरून भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्यात श्रेयवाद सुरू झाला आहे. ( When Rohit Pawar met Gadkari, Sujay Vikhen said, "I am also trying ... )
चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदे-जामखेड-बीड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. हे काम सुरू व्हावे या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी सहा दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी हे काम लवकर सुरू करण्याची विनंतीही केली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जामखेड तालुक्यातील एका सभेत या रस्त्याचे लवकरच काम होईल असे आश्वासन दिले होते.
खासदार डॉ. विखे पाटील यांनी आज ( गुरुवारी ) प्रसिद्धीपत्रक काढत या रस्त्याच्या कामासाठी ते स्वतः केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे जामखेडमधील या रस्त्याच्या कामावरून श्रेयवाद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
खासदार डॉ. विखे पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 डी जामखेड ते सौताडा या 13.40 किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाच्या कॉक्रीट रस्त्याचा 197.62 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. लवकरच या प्रस्तावर प्रशासकीय मान्यता मिळणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
हा रस्ता जामखेड शहरातून जाणारा असून, जामखेड शहरामध्ये 3.60 किलोमीटर लांबीमध्ये कॉक्रेटीकरणासह या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तसेच शहरातील या भागात कॉक्रीट गटार, दुभाजक, पथदिवे इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा रस्ता दळणवळणासाठी मोठा उपयुक्त ठरणार आहे.
उर्वरीत लांबीमध्ये 10 मीटर रुंदीच्या कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. जामखेड वगळता साकद फाटा, मोहा, सौताडा या गावांमधून जाणाऱ्या भागामध्ये दुतर्फा कॉंक्रीट गटारांचे बाधकाम करण्यात येणार असून, या ठिकाणी 10 मीटर काँक्रीट रस्ता व बाजूला कॉंक्रीट गटारापर्यंत डांबरीकरणाने रुंदीकरण करण्यात येणार आहे.
विंचरणा नदीवर नवीन मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यात येणार असून, उर्वरीत लांबीतील तीन लहान पुलांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. सौताडा घाटामध्ये वाहतुकीच्या सोईसाठी व सुरक्षिततेसाठी घाटातील चढ कमी करुन, रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपला पाठपुरावा सातत्याने सुरु आहे. ही कामे वेळेत आणि चांगल्या दर्जाने पूर्ण व्हावीत हा माझा प्रयत्न आहे. रस्त्यांची कामे मार्गी लावून हे सर्व मार्ग दळणवळणासाठी लवकरच सुरळीत करण्यास माझे प्राधान्य आहे.
- खासदार डॉ. सुजय विखे पाटील
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.