Shahajibapu Patil : काय ते वर्क आऊट, काय ते डाएट.., एका आठवड्यात ९ किलो वजन घटवलं; शहाजीबापूंचा नवा लूक

Shahajibapu Patil News : शहाजीबापू पाटील यांच्या वेटलॉस मागील गमकं नेमकी काय? सोशल मीडियावर चर्चा
Shahajibapu Patil
Shahajibapu PatilSarkarnama

Shahajibapu Patil News : शिंदे गटाचे (Shinde group) सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या डायलॉगमुळे देशभरात फेमस आहेत. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल हा त्यांचा डायलॉग चांगलाच गाजला. त्यामुळे त्यांची देशभर चर्चा देखील झाली. आता पुन्हा एकदा शहाजीबापू पाटील हे चर्चेत आलेत.

मात्र, यावेळी ते त्यांच्या डायलॉगमुळे नाही तर त्यांनी कमी केलेल्या वजनामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी ८ दिवसांत तब्बल ९ किलो वजन कमी केलंय. याबाबत कमी केलेल्या वजनाचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

आमदार शहाजीबापू पाटील यांचे मागील काही दिवसांपासून खूपच वजन वाढलं होतं. त्यामुळे त्यांना काहीसा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेत थेट श्री श्री रविशंकर यांच्या पंचकर्म व सुदर्शन क्रिया या शिबिरात सहभाग घेण्याचं ठरवलं.

त्यानंतर त्यांनी बंगळुरु येथील श्री.श्री.रविशंकर यांच्या आश्रमात शिबिरात सहभाग घेतला. या शिबिरादरम्यान त्यांनी ८ दिवस योग प्राणायाम आणि ध्यान धारणा केली. तसेच ८ दिवस त्यांनी समतोल आहार घेत त्यामध्ये उकडलेल्या पालेभाज्या, फळभाज्याचा आहारात समावेश केला.

Shahajibapu Patil
Ramdas Athwale News : महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद.. ; आठवलेंनी पुन्हा डिवचलं

या शिबिरादरम्यान त्यांनी या सर्व नियमांचे पालन करत ८ दिवसानंतर तब्बल ९ किलो वजन कमी केलं. याबाबत त्यांचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आमदार शाहजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दरम्यान, त्यांनी फक्त ८ दिवसात तब्बल ९ किलो वजन कमी केल्यामुळे त्यांच्या या वेटलॉस मागील गमकं नेमकी काय आहे याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com