Nagar Water Distribution Issue : समन्यायी पाणीवाटप कायद्यावरून थोरातांचा निशाणा कुणावर ?

Sangamner News : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 वी वार्षिक सर्वसाधारण सभा थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : कमी पाऊस झाला की उद्भवणारा नाशिक-नगर विरुद्ध औरंगाबाद-मराठवाडा पाणी संघर्ष यंदाही कमी पाऊस झाल्याने जायकवाडी पुरेसे न भरल्याने उद्भवणार अशी चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर समन्यायी पाणीवाटप कायद्याविरोधात आपणच संघर्ष केला, असे मोठे विधान माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू आहे. मात्र, संघर्षाच्या वेळेस अनेक पुढारी गप्प बसून होते, अशी टीकाही आमदार थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केली आहे.

2014 मध्ये राष्ट्रपती राजवट असताना समन्यायी कायदा लागू झाला. मात्र, या कायद्यातील त्रुटींबाबत आपण सातत्याने आवाज उठवला. या कायद्याच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील जनता एकत्र येऊन तालुका बंद ठेवून तीव्र आंदोलने केली. मोर्चे काढले, संघर्ष केला, या कायद्याविरोधात आपली न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू आहे. मात्र, संघर्षाच्या वेळेस अनेक पुढारी गप्प बसून होते, अशी टीकाही आमदार थोरात यांनी केली आहे.

Balasaheb Thorat
Raju Shetti News: पुढच्या वेळी खासदार होऊनच या! 'बाप्पा'समोर शाहू छत्रपतींनी दिल्या राजू शेट्टींना शुभेच्छा...

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी बोलताना थोरात यांनी समन्यायी पाणीवाटप कायद्यावर भाष्य केले. कारखान्याने अत्यंत अडचणींतून चांगले काम करताना या वर्षी 10 लाख मेट्रिक टनांचे गाळप केले आहे. यावर्षी कारखाना उसाला प्रतिटन 2835 रुपये भाव दिला जाणार असल्याचे थोरात यांनी जाहीर केले.

निळवंडे धरणासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2014 ते 19 कालव्यांची कामे थंडावली होती. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच रात्रंदिवस कामाला गती दिली. कोरोना काळातही या कामाचा पाठपुरावा केला. आपले सरकार असते तर डावा कालव्यातून दोनदा आणि उजवा कालातून एकदा पाणी दिले असते. पाणी तालुक्यात आले आपण मोठा आनंदोत्सव साजरा केला. मात्र, हा आनंद काहींना पाहावत नसल्याने तातडीने पाणी बंद केले, असा आरोप थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com