Ajit Pawar on Riots in Maharashtra: महाराष्ट्रात दंगली का होत आहेत? अजित पवारांचा गृहमंत्र्यांना थेट सवाल

Maharashtra Politics | हाप पॅन्टमध्ये दर्शन घेतले तर काय बिघडलं,
Ajit Pawar on Riots in Maharashtra:
Ajit Pawar on Riots in Maharashtra: Sarkarnma

Ajit Pawar on Devendra Fadnavis : राज्यात दंगली होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पण कोणत्याही जाती, धर्मांत आणि पंथात दुसऱ्याचा द्वेष आणि अनादर करु नये, असं सांगितलं आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदरयुक्त भीती राहिल, असा गृहखात्यावर वचक ठेवावा, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीसांना सुनावलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते. (Why are there riots in Maharashtra? Ajit Pawar's direct question to the Home Minister)

Ajit Pawar on Riots in Maharashtra:
Raj thackeray On Shadow Cabinet : मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पुढं काय झालं? राज ठाकरे म्हणाले..

तसेच, महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्यासाठी सुरु असलेल्या अप्रत्यक्ष प्रयत्नांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला."आजकाल कोण कशी वक्तव्ये करत आहेत, हे आपण पाहत आहोत. पण आज महाराष्ट्रात दंगली का होत आहेत? असा सवालही उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारीवरुन लक्ष विचलित करत आहे. राज्यात दंगली होणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. पण कोणत्याही जाती, धर्मांत आणि पंथात दुसऱ्याचा द्वेष आणि अनादर करु नये, असंही पवार यांनी म्हटलं. (Maharashtra poltiics)

मंदिरामध्ये जाताना पोशाखावरुन सुरु असलेल्या वादावरुनही टीका केली. ते म्हणाले तो पोशाख आहे, हाप पॅन्टमध्ये दर्शन घेतले तर काय बिघडलं, कोणत्या रस्त्याने महाराष्ट्र घेऊन चालला आहात?" "अरे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काय काय केलं हे जनतेला माहित आहे. या वर्षभरात गद्दार शब्द, पन्नास खोके हे शब्द जनतेले पटले आहेत. या सरकारने आत्मपरीक्षण केलं पाहिजे," असे अजित पवार म्हणाले. "कर्नाटक निवडणुकीत जे घडले, तेच महाराष्ट्रात घडेल, सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी जन्माला येत नाही," असे ते म्हणाले. (Devendra Fadanvis)

Ajit Pawar on Riots in Maharashtra:
Yavatmal District News : तुळशीनगरच्या सरपंच, उपसरपंचासह चार सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाने खळबळ !

राज्य सरकारच्या कारभारावर अजित पवार यांनी जोरदार निशाणा साधला. "राज्याचा विकास व्हावा, असेच आम्हाला वाटेत. राज्यावर 1 लाख कोटीची बिले देणे बाकी आहेत. राज्यात भ्रष्टाचार वाढलाय. राज्यकर्त्यांना 10-11 महिने झाले आहेत. जूनमध्ये 12 महिने होतील. आर्थिक शिस्त कुठे गेली. वर्षभरात गद्दार, 50 खोके शब्द जनतेला पटलेला आहे. तुम्ही काय काय केले हे जनतेला माहित आहे," असे अजित पवार म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com