Sujay Vikhe Patil Criticized Mahavikas Aghadi: संगमनेरमध्ये 'त्या' युवकांवर हल्ला का झाला..? सुजय विखेंनी दिलं उत्तर

Ahmednagar Politics: गेल्या आठवड्यात जोर्वे गावातील काही तरुणांनी घरी जाणाऱ्या युवकांना पिकअप गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून काही जणांनी मारहाण केली हाती
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Sujay Vikhe Patil On Mahavikas Aghadi: भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनेवर जातीय द्वेष पसरवतात असा सातत्याने आरोप होतो. पण वेगवेगळे लोक येथे येऊन बोलतात, तेढ निर्माण करतात. काही ठराविक गटाकडून वातावरण बिघडवण्याचं जे काम होतयं. जाणीवपूर्व वातावरण बिघडवलं जात असेल, तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असा अप्रत्यक्ष इशारा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

गेल्या आठवड्यात जोर्वे गावातील काही तरुण संगमनेर शहरातील काम आटोपून घरी जाणाऱ्या युवकांना पिकअप गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून काही जणांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sujay Vikhe Patil
Devendra Fadnavis News: गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर वन; फडणवीस म्हणाले, "विरोधकांनी आता तरी..."

राजकीय हेतूने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा प्रदीर्घ काळासाठी पाठीशी घातले गेले, ते मतदानाच्या दृष्टीने म्हणा, असे लोक प्रदीर्घ काळासाठी पाठिशी घातले जातात तेव्हा ते कधीना कधी नियंत्रणाबाहेर जातातच. संगमनेरमध्ये हा जो स्फोट झाला, तो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई न करणे,पोलीस प्रशासनावर दबाव टाकणे, महसूल प्रशासनावर दबाव टाकला गेला, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) कालावधीत पोलिंसावर दबाव टाकला गेला, त्याच हा स्फोट असू शकतो, असं माझं व्यक्तिश: मत आहे. असही सुजय विखे-पाटील यावेळी म्हणाले.

दोन गटात वाद होणं, एखाद्या जमिनीवरुन, बांधावरुन वाद होण हे सामान्य आहे. पण एखाद्या छोट्याशा गोष्टींवरुन किंवा फक्त कोणीतरी हॉर्न वाजवला म्हणून प्रवृत्त होणं याचा अर्थ यात सर्वात आधी हल्ला कोणी केला. याची सुरुवात कोणी केली. याला महत्त्व आहे.

Sujay Vikhe Patil
Rajasthan Politics : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप? ; पायलट नवा पक्ष काढणार..

जोरवे गावात नेहमीप्रमाणे दिनचर्या सुरु होती. पण अचाकन एका छोट्या गोष्टीवरुन तिथे हाणामारी आणि हल्ले झाले. ज्या आत्मविश्वासाने हे केलं जातं, कुणाचं तरी पाठबळ असल्याशिवाय असे या गोष्टी होत नाहीत. अशा घटना हल्ली वाढत चालल्या आहेत. हा जनआक्रोश मोर्चा आहे. हे अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात धगधगतं होतं जे आज बाहेर पडणार आहेत. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com