Baramati Loksabha : बारामती माझा आत्मा; तेथून लोकसभा लढण्याची अंतिम इच्छा; महादेव जानकरांनी दंड थोपटले

एक दिवस मी पंतप्रधान होऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : बारामती तर माझा आत्मा आहे, त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची माझी अंतिम इच्छा आहे, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर यांनी स्पषट केले. (Willing to contest Lok Sabha elections from Baramati: Mahadev Jankar)

राष्ट्रीय समाज पक्षाच्या जनस्वराज्य रॅलीची सुरुवात आज (ता. १० जुलै) पंढरपुरातून करण्यात आली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना आमदार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बारामती (Baramati) मतदारसंघातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

Mahadev Jankar
Mahadev Jankar News : लोकसभेच्या ५, विधानसभेच्या २५ जागा सोडा; अन्यथा सर्व पर्याय खुले : जानकरांचा भाजपला इशारा

जानकर म्हणाले की, बारामतीतून पुन्हा लढण्याची इच्छा आहे. बारामती तर माझा आत्मा आहे. एक दिवस मी पंतप्रधान होऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहे आणि तेही माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या जोरावर. मी कोणाचीही मदत घेऊन येणार नाही. आमची आघाडी कुणाबरोबही होऊ शकते, मात्र माझी अंतिम इच्छा ही बारामतीतून लढण्याची आहे.

लोकसभेची निवडणूक मी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांतून लढणार आहे. महाराष्ट्राबाहेर माझी भाजपशी युती नाही, त्यामुळे बाहेर मी स्वतंत्र लढणार आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

Mahadev Jankar
Shinde Vs Thackeray : शिवसेना अन॒ धनुष्यबाण ठाकरेंना मिळणार की शिंदेंकडे कायम राहणार; येत्या ३१ जुलै रोजी होणार सुनावणी

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील फुटीबाबत म्हणाले की, काही प्राब्लेमुळे पवारांनी अजितदादांना जावा, असं सांगितलं असू शकते. पण, सध्या पवार ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरायला लागले आहेत, त्यामुळे त्यांचं गणित आपण काही सांगू शकणार नाही. शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. माझा जन्म झाला होता, त्यावेळी ते राज्याचे गृहमंत्री होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही, अशी भूमिकाही त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीवर घेतली.

Mahadev Jankar
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत नवी घडामोड; सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर होणार फैसला

जानकर म्हणाले की, जनता ठरवेल कोण चांगलं आणि कोण वाईट. ‘एनडीए’ने आम्हाला बाहेर ढकललं तर आम्हाला कोणीही अस्पृश्य नाही. आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. आम्हाला पाच जागा दिल्या नाही, तर आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com