माळेगाव : बारामतीत (Baramati) माळेगाव नगरपंचायतीला राजकिय दृष्ट्या विशेष महत्व आहे. त्यामुळे ही नगर पंचायत भाजपच्या झेंड्याखाली आणायची आहे. त्या दृष्टीने येथील नेतेमंडळींसह कार्य़कर्त्यांनी आत्तापासून कामाला लागले पाहिजे. ज्या दिवशी ही नगरपंचायत भाजपच्या (BJP) ताब्यात येईल, त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकास निधी माळेगावला दिला जाईल, असे आश्वासन देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माळेगावची निवडणूक पुर्ण क्षमतेने लढविणार असल्याचे जाहिर केले. (Chandrashekhar Bawankule, Baramati News)
माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्य़क्रम पुढील काही दिवसात निवडणूक आयोग जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसंस्थेच्या दृष्टीने माळेगाव तालुक्यात मोठे गाव आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक, विधानसभा तयारीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी मंगळवार (ता. ६) रोजी रात्री माळेगावात बुथ कमिटीतील कार्य़कर्त्यांची विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होत. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, आमदार राहुल कुल, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोठे, भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, ज्येष्ठ नेते चंद्रऱाव तावरे, पृथ्वीराज जाचक, जिल्हाध्यक्ष गणेश भोगडे, दिलीप खैरै आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले,`` देशात पंतप्रधान मोदीसाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. त्यात आता महराष्ट्रात भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणे खूपच सोपे झाले आहे. भाजपच्या वरीष्ठ नेतृत्वांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविलेल्या लोकहिताच्या योजना गावोगावी पोचविण्यासाठी प्रत्येक कार्य़कर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. लोकांचा पाठिंबा भाजपला आहेच, त्यात वाढ करून यापुढील काळातील लोकसभा निवडणूक असो, अथवा माळेगावसारख्या नगरपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणूका जिंकायच्या आहेत.``, असे बावनकुळे म्हणाले.
तत्पुर्वी रंजन तावरे म्हणाले, `` पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार लोकसभा, विधानसभा असो अथवा माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूकीत कमळ फुलविण्यासाठी कार्य़कर्त्यांनी प्रमाणिकपणे कृतीआराखडा आमंलात आणला पाहिजे. अर्थात या कामात ज्येष्ठ नेतेमंडळीही मागे राहणार नाहीत.`` यावेळी माजी सरपंच जयदीप तावरे, अशोकराव सस्ते, धैर्य़शिल तावरे, शशिकांत तावरे, अनिल लोणकर, युवराज तावरे, अजित तांबोळी, युसूफ शेख आदी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या दृष्टीने वरिष्ठांसमोर सूचना मांडल्या.
दरम्यान, बारामती काबीज करण्यासाठी भाजपकडून केंद्रीय पातळीपासून ते राज्यातील स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहे. मात्र पवारांचा अभेद असलेला बारामती मतदारसंघात भाजपला यश मिळेल का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.