भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नगराध्यक्षपदासाठी बंडाचे निशाण...

दहिवडी (ता. माण) Dahiwadi नगरपंचायतीच्या Nagarpanchayat नगराध्यक्ष Mayer पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर राष्ट्रवादी NCP अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली होती.
Sagar Pol, Mahesh Jadhav, Dhanaji Jadhav
Sagar Pol, Mahesh Jadhav, Dhanaji Jadhavsarkarnama

दहिवडी : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीतील असंतोष उफाळून आला असून नगरसेवक महेश जाधव यांनी भाजपच्या नगरसेवकांच्या मदतीने नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करुन बंडाचे निशाण फडकवले आहे.

दहिवडी (ता. माण) नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठी चढाओढ सुरु झाली होती. नगरसेवक महेश जाधव व सागर पोळ यांच्या समर्थकांनी आपलाच नेता नगराध्यक्ष होणार म्हणून समाजमाध्यमातून जोरदार प्रसिद्धी चालवली होती. यासोबतच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत हे आपल्या पत्नीसाठी आग्रही होते. तर सुरेंद्र मोरे यांना नगराध्यक्ष पद मिळावे असाही एक मतप्रवाह होता.

Sagar Pol, Mahesh Jadhav, Dhanaji Jadhav
राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल

मात्र, प्रभाकर देशमुख यांनी आपले मत सागर पोळ यांच्या पारड्यात टाकून सागर पोळ यांना राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून जाहीर केले. आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी दुपारी १२:४३ वाजता भाजपचे धनाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर निलम जाधव यांनी सुचक म्हणून तर रुपेश मोरे अनुमोदक म्हणून सही केली. दुपारी १२:४५ वाजता शिवसेनेच्या सुरेखा पखाले यांनी आपला अर्ज भरला. त्यांना शैलेंद्र खरात हे सुचक तर विजया जाधव अनुमोदक आहेत.

Sagar Pol, Mahesh Jadhav, Dhanaji Jadhav
प्रभाकर देशमुख ठरवणार दहिवडीचा नगराध्यक्ष..!

दुपारी ठिक १:२५ वाजता सागर पोळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्यांना निलिमा पोळ ह्या सुचक तर विशाल पोळ हे अनुमोदक आहेत. मात्र, अर्ज भरण्यास फक्त पाच मिनिटे उरली असताना नाट्यमय घडामोड घडली. भाजपचे धनाजी जाधव हे भाजपच्या राणी अवघडे यांना घेवून नगरपंचायतीत आले. अनेकांचा असा समज झाला की राणी अवघडेंचा पण अर्ज भरणार आहेत. परंतू, येथे धनाजी जाधव यांनी राष्ट्रवादीला सुरुंग लावल्याचे स्पष्ट झाले.

Sagar Pol, Mahesh Jadhav, Dhanaji Jadhav
शेखर गोरेंची बहिणीला भाऊबीज! नगरपंचायतीत शिवसेनेच्या सुरेखा पखाले बिनविरोध

बरोबर १:५५ वाजता महेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज सुचक असलेल्या राणी अवघडे यांनी भरला. तर भाजपच्या उज्वला पवार या अनुमोदक आहेत. ही माहिती बाहेर येताच राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली. तत्काळ महेश जाधव यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र महेश जाधव यांचा मोबाईल बंद असल्यामुळे ते कुठे आहेत हे समजू शकले नाही.नऊ फेब्रुवारी ही अर्ज माघारी घेण्याची तारीख असून दहा फेब्रुवारीला नगराध्यक्षाची निवड होणार आहे. आज झालेल्या घडामोडीमुळे राजकीय वातावरण तापले असून नऊ व दहा तारखेला काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com