Karad News : हो... हो... तुमच्या मनात आहे तेच होईल; बावनकुळेंच्या भेटीनंतर आनंदराव पाटलांचे सूचक वक्तव्य

Anandrao Patil कराडच्या दौऱ्यात आनंदराव पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.
Chandrashekhar Bawankule, Anandrao Patili
Chandrashekhar Bawankule, Anandrao Patilisarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Karad BJP News : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असलेले माजी आमदार आनंदराव पाटील हे त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे अतुल भोसले यांना साथ दिली. काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कऱ्हाड दौऱ्यात आनंदराव पाटील यांनी त्यांची आज भेट घेऊन चर्चा केली. याबाबत त्यांनी 'हो...हो... त्याचीच चर्चा झाली. लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल', असे सांगून त्यांनी भाजपवासी होण्याचे संकेत दिले. सध्या याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांच्या कुटुंबाशी पहिल्यापासून माजी आमदार आनंदराव पाटील Anandrao Patil हे एकनिष्ठ राहिले. आमदार चव्हाण यांच्या चढउतारात आनंदराव पाटील यांनी त्यांना साथ दिली. चव्हाण हे मुख्य़मंत्री असताना त्यांचा उजवा हात आणि प्रतिमुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती.

एवढा त्यांचा आणि आमदार चव्हाण यांचा समन्वय होता. मात्र, मध्यंतरी काही घडामोडी घडल्या. त्यातून माजी आमदार पाटील हे आमदार चव्हाण यांच्यापासून दूर गेले. पुन्हा आता त्या दोघांतील संबंध सुधारतील असे चित्र नाही. त्यामुळे माजी आमदार पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे अतुल भोसले यांना साथ देण्यास सुरुवात केली आहे.

मध्यंतरीच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पाटील यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना साथ दिली, तर बाजार समितीसह अन्य काही निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भोसले गटाला साथ दिली. दरम्यान, मध्यंतरी पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसादरम्यान लवकरच तुम्हाला नवीन बातमी देऊ, असे सूचक वक्तव्य केले होते.

Chandrashekhar Bawankule, Anandrao Patili
साताऱ्यात चंद्रशेखर बावनकुळेंनी शब्दच दिला | Chandrashekhar Bawankule | Satara News

त्यामुळे आनंदराव पाटील हे भाजपवासी होणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, काल आणि आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात आनंदराव पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना काय चर्चा झाली, अशी विचारणा केल्यावर पाटील यांनी हो...हो... त्याचीच चर्चा आज झाली. लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल, असे सांगून अधिक बोलणे टाळले. त्यांनी ते भाजपवासी होणार असल्याचेच संकेत दिले. त्याला भाजपचे अतुल भोसले यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ते लवकरच भाजपवासी होतील अशी आशा आहे.

Edited By Umesh Bambare

Chandrashekhar Bawankule, Anandrao Patili
Kolhapur BJP Politics : पालकमंत्री अन् कार्यकारिणीवरून भाजपत वाद; कोल्हापुरात नेमकं काय चाललंय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com