Solapur Politics : सोलापूरच्या नेत्यांना झालंय तरी काय? काल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आज भाजपत हमरीतुमरी

BJP& Congress News : भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये आज हमरीतुमरी झाली.
Congress and BJP
Congress and BJP Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूरच्या काँग्रेस भवनात रविवारी (ता. २० ऑगस्ट) दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती, तर आज (ता. २१ ऑगस्ट) भारतीय जनता पक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी झाली. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे सोलापूरच्या राजकीय नेत्यांना झालंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Yesterday fight between Congress workers, today there was a fight in BJP)

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरच्या काँग्रेस भवनात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर बहुतांश कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्यासोबत फोटो काढला. मात्र, त्या गर्दी प्रणिती शिंदे यांच्यासोबत फोटो काढता आली नाही, या रागातून काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती.

Congress and BJP
Dhananjay Munde On Onion Issue : कांदा निर्यातीवरील शुल्कवाढीस कृषिमंत्री मुंडेंचा विरोध; म्हणाले ‘मी उद्याच दिल्लीला जातोय...’

आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस भवनातून निघून गेल्यानंतर हा प्रकार घडला. ते सर्वजण पायऱ्या उतरत असतानाच दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दोघांना आवरल्याने त्यामुळे वाद मिटला. मात्र, हाणमारीचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होऊन पक्षाची छी थू व्हायची ती झालीच.

दरम्यान, गैरसमजातून दोघांमध्ये किरकोळ शाब्दीक बाचाबाची झाली. दोघांची समजूत घालून गळाभेट घडवून आणली आहे. दोघांमध्ये आता कोणताही वाद राहिलेला नाही, असे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.

Congress and BJP
Walse Patil On His Statement: ‘ती’ दिलगिरी गैरसमजाबद्दल; पवारांबाबतच्या विधानावर वळसे पाटील ठाम, अजितदादांचा संपूर्ण गट पाठीशी...

काँग्रेस भवनात घडलेल्या हाणमारीमुळे शहरात पक्षाची नाचक्की झाली. तो प्रकार ताजा असतानाच आज सोलापुरात भाजपमध्येही अंतर्गत वादातून हमरीतुमरी झाली. भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मध्यस्थी करत तो वाद मिटवला. त्यामुळे सोलापुरातील राजकीय क्षेत्रात सलग दोन दिवस हाणामारी आणि हमरीतुमरीच्या घटना घडल्या आहेत.

Congress and BJP
Narendra Kale Attack On Walse Patil : 'पवारसाहेब तुमचं चुकलंच… या नेत्यांनी जिल्ह्यातून स्वतःशिवाय दुसरं कोणी निवडून येणार नाही, हेच बघितलं’

नागपंचमीनिमित्त आयोजित पुजेच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाली. त्या कार्यक्रमाला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे उशिरा आले. त्यावेळी फोटो काढण्यावरून भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी झाली. सोलापूरच्या राजकारणातील चकमक ही चिंता करण्यासाखी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com