अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समिती निवडणुकांसाठी गट-गण निहाय आरक्षण सोडत आज काढण्यात आली. यात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके सुनील गडाख, सुनीता भांगरे, राजेश परजणे, सुवर्णा जगताप, सीताराम राऊत, कैलास वाकचौरे, रमेश देशमुख, अण्णासाहेब शेलार अशा काही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असलेल्या दिग्गांना फटका बसला आहे. ( Zilla Parishad groups reservation announced )
आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष प्रताप शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते तथा धुमाळवाडी गटातील कैलास वाकचौरे, अर्थ व पशू संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, राजूर गटातील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे, सुनीता भांगरे व अमित भांगरे, बेलवंडी गटातील अण्णासाहेब शेलार, घुलेवाडीतील सीताराम राऊत यांच्यासह भाजपचे नेते सुजीत झावरे, सचिन पोटरे, कोळगाव गटातील दत्तात्रेय पानसरे अशा दिग्गजांना नवीन गट शोधावा लागेल अथवा पाच वर्षे थांबावे लगण्याची शक्यता आहे.
या राजकीय परिस्थितीमुळे राजकीय नेत्यांते व कार्यकर्त्यांत नाराजी आहे. अकोले, श्रीगोंदे, नेवासे, कर्जत, पारनेर या तालुक्यांत दिग्गज नेत्यांनाच या आरक्षण सोडतीने धक्का बसला आहे. कैलास वाकचौरे यांनी नुकतेच पिचड पिता-पुत्रां विरोधात बंड केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांना जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी जागाच उरलेली नाही. हीच स्थिती भांगरे व गडाख कुटुंबियांबाबत झाली आहे. सुनीता भांगरे व सुनील गडाख यांना उभे राहण्यासाठी गटच उरलेला नाही.
विखे गटाची वाढली चिंता
अण्णासाहेब शेलार हे पूर्वी जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष होते. श्रीगोंदे तालुक्यातील विखे गटाचे ते दिग्गज नेते समजले जातात. नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत त्यांनी नागवडे गटाला आपली ताकद दाखविली होती. मात्र त्यांनाही यंदा बेलवंडी सोडावी लागण्याची चिन्हे आहेत. मांडवगण गटात मागील 15 वर्षांपासून जगताप कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. सुरवातीला सचिन जगताप तर सध्या सुवर्णा जगताप या जिल्हा परिषद सदस्या होत्या मात्र आरक्षणामुळे जगताप कुटुंबालाही या गटात उमेदवारी करता येणार नाही. तसेच विखे गटातील आणखी एक दिग्गज नेते दत्तात्रेय पानसरे यांनाही जिल्हा परिषदेची निवडणूक लढविता येणार नाही. जिल्हा परिषदेतील अभ्यासू नेते राजेश परजणे यांच्या गटात महिला आरक्षण पडले आहे. हा विखे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.
कर्जत व पारनेर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात आरक्षण पडल्याने अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. यात सचिन पोटरे, सुजित झावरे, राहुल नंदकुमार झावरे अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नगर तालुक्यात तर माधवराव लामखडे यांचा गट अनुसूचित जातीसाठी, शरद झोडगे, प्रताप शेळके यांचा गट महिलांसाठी राखीव आहे.
जिल्हा परिषदेतील गट निहाय आरक्षण
अनुसूचित जाती
1. मिरजगाव - कर्जत, 2. आढळगाव, 3.नवनागपूर - नगर तालुका, 4. अमरापूर - शेवगाव, 5. चापडगाव - कर्जत, 6. बेलवंडी - श्रीगोंदे, 7. कोरेगाव, 8. घुलेवाडी - संगमनेर, 9. कोळगाव - श्रीगोंदे, 10. मांडवगण - श्रीगोंदे, 11. चांदा - नेवासे
अनुसूचित जमातीसाठी राखीव
1. धुमाळवाडी - अकोले, 2. सुरेगाव - कोपरगाव, 3. ढवळपुरी - पारनेर, 4. शिंगणापूर - कोपरगाव, 5. बारागाव नांदूर - राहुरी, 6. पाचेगाव - नेवासे, 7. बेलपिंपळगाव - नेवासे, 8. आश्वी बु. - संगमनेर
नागरिकांचा मागास प्रवर्ग
1. राजूर - अकोले, 2. पाडाळणे - अकोले, 3. तळेगाव - संगमनेर, 4. करंजी बु. - कोपरगाव, 5. कोल्हार बु. - राहाता, 6 उंदीरगाव - श्रीरामपूर, 7. दत्तनगर - श्रीरामपूर, 8. बेलापूर - श्रीरामपूर, 9. भानसहिवरे - नेवासे, 10. सोनई - नेवासे, 11. दहिगावने - शेवगाव, 12. मुंगी - शेवगाव, 13. बोधेगाव - शेवगाव, 14. भातकुडगाव - शेवगाव, 15. नागरदेवळे - नगर, 16. कान्हूर पठार - पारनेर, 17. राशीन - कर्जत, 18. साकत - जामखेड, 19. जवळा - जामखेड, 20. खर्डा - जामखेड, 21.उंबरे - राहुरी, 22. सात्रळ - राहुरी
अनुसूचित जाती महिला
1. नवनापूर (नगर), 2. घुलेवाडी (संगमनेर), 3. मिरजगाव (कर्जत), 4. मांडवगण (श्रीगोंदे), 5. चांदा (नेवासे), 6. कोळगाव (श्रीगोंदे).
अकोले पंचायत समिती 12 गण
समशेरपुर गण-सर्वसाधारण, खिरविरे गण- सर्वसाधारण, देवठाण गण-अनुसूचीत जमाती महिला, गणोरे गण-अनुसूचीत जमाती महिला, धुमाळवाडी गण-अनुसूचीत जमाती, धामणगाव आवारी-अनुसूचीत जमाती महिला, राजुर गण-अनुसूचीत जाती, वारंघुशी गण-सर्वसाधारण महिला, पाडाळणे गण-सर्वसाधारण महिला, शेलद गण-सर्वसाधारण महिला, कोतुळ गण-अनुसूचीत जमाती, ब्राम्हणवाडा गण-अनुसूचीत जमाती
शेवगाव तालुका पंचायत समिती 10 गण
दहिगावन गण - सर्वसाधारण महिला, एरंडगाव गण - सर्वसाधारण महिला, चापडगाव गण - सर्वसाधारण, मुंगी गण- सर्वसाधारण, बोधेगाव गण - सर्वसाधारण महिला, लाडजळगाव गण- सर्वसाधारण महिला, भातकुडगाव गण- सर्वसाधारण, वाघोली गण- अनुसुचित जाती, अमरापूर गण- ना. मा. प्रवर्ग महिला, आखेगाव गण- ना. मा. प्रवर्ग.
पाथर्डी तालुका पंचायत समिती 10 गण
कासारपिंपळगाव गण - सर्वसाधारण महिला, कोरडगाव गण - सर्वसाधारण महिला, तिसगाव गण - ना.मा.प्र. महिला, माळीबाभुळगाव गण - सर्वसाधारण, माणिकदौंडी गण - सर्वसाधारण, टाकळीमानूर गण - अनुसुचित महिला, मिरी गण - ना.मा.प्र. पुरूष, करंजी गण - सर्वसाधारण, भालगाव गण - सर्वसाधारण, अकोला गण - सर्वसाधारण महिला
कर्जत पंचायत समिती 10 गण
निमगाव गांगर्डा गण - सर्वसाधारण महिला, मिरजगाव गण - सर्वसाधारण महिला, चापडगाव गण - सर्वसाधारण, टाकळी खंडेश्वर गण - सर्वसाधारण महिला, कोरेगाव गण - सर्वसाधारण, आळसुंदे गण - ना. मा. प्र. महिला, कुळधरण गण - अनुसुचित जाती महिला, बारडगाव सुद्रिक गण- सर्वसाधारण, राशिन गण सर्वसाधारण, भांबोरा गण - ना. मा. प्रवर्ग.
जामखेड पंचायत समिती 6 गण
साकत गण - सर्वसाधारण, शिऊर गण- अनुसुचित जाती महिला, जवळा गण- ना. मा. प्रवर्ग महिला, अरणगाव गण- सर्वसाधारण, खर्डा गण - सर्वसाधारण गण, नान्नज गण- सर्वसाधारण महिला.
नेवासा पंचायत समिती 16 गण
बेलपिंपळगाव - ना. मा. प्रवर्ग महिला, प्रवरासंगम- अनुसुचित जाती महिला, खामगाव - सर्वसाधारण, सलबतपूर- सर्वसाधारण, कुकाणा - सर्वसाधारण, भेंडा बु.- ना. मा. प्रवर्ग महिला, मुकिंदपूर- सर्वसाधारण महिला, भानसहिवरे - सर्वसाधारण महिला, पाचेगाव - अनुसुचित जमाती, करंजगाव - ना. मा. प्रवर्ग, खरवंडी - सर्वसाधारण महिला, शिंगणापूर - सर्वसाधारण महिला, सोनई - सर्वसाधारण महिला, घोडेगाव - अनुसुचित जाती, चांदा - सर्वसाधारण, देडगाव - ना. मा. प्रवर्ग.
पारनेर तालुका पंचायत समिती गण 12
रांजणगाव मशिद गण- अनुसूचित जाती, भाळवणी गण - अनुसूचित जमाती, वासुंदे - नागरिकांचा मागास प्रवर्ग, वाडेगव्हाण - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सुपा - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ढवळपुरी गण - सर्वसाधारण व्यक्ती, टाकळी ढोकेश्वर - सर्वसाधारण महिला, कान्हूर पठार - सर्वसाधारण महिला, वडझिरे - सर्वसाधारण महिला, आळकुटी - सर्वसाधारण व्यक्ती, निघोज - सर्वसाधारण व्यक्ती, जवळा- सर्वसाधारण महिला.
राहाता तालुका पंचायत समिती 12 गण
सावळीविहीर बु. - ना. मा. प्रवर्ग महिला, पुणतांबा - अनुसुचित जमाती महिला, वाकडी - सर्वसाधारण, अस्तगाव - ना. मा. प्रवर्ग, निमगाव कोऱ्हाळे - अनुसुचित जाती महिला, साकुरी - सर्वसाधारण महिला, पिंपरी निर्मळ - ना. मा. प्रवर्ग महिला, बाभळेश्वर - सर्वसाधारण महिला, लोणी खु. - सर्वसाधारण, लोणी बु. - सर्वसाधारण, कोल्हार बु. - सर्वसाधारण, दाढ बु.- अनुसुचित जाती.
नगर तालुका पंचायत समित गण 14
देहरे - सर्वसाधारण, वडगाव गुप्ता - ना. मा. प्रवर्ग, जेऊर- अनु. जाती महिला, शेंडी - ना. मा. प्रवर्ग, नागरदेवळे - सर्वसाधारण, बुऱ्हाणनगर- सर्वसाधारण महिला, केकती - सर्वसाधारण महिला, चिचोंडी पाटील- सर्वसाधारण, दरेवाडी - सर्वसाधारण महिला, अरणगाव - अनु. जाती, नवनागापूर - ना. मा. प्रवर्ग महिला, नेप्ती - सर्वसाधारण, वाळकी - सर्वसाधारण महिला, गुंडेगाव - सर्वसाधारण.
श्रीगोंदे तालुका पंचायत समिती गण 14
देवदैठण गण- सर्वसाधारण, पिंपळगाव पिसा- ना. मा. प्रवर्ग महिला, कोळगाव गण - ना. मा. प्रवर्ग, घारगाव गण- सर्वसाधारण महिला, मांडवगण गण- सर्वसाधारण, भानगाव गण- अनुसूचित जाती महिला, आढळगाव गण- ना. मा. प्रवर्ग महिला, पेडगाव गण - अनुसूचित जाती, येळपणे गण- सर्वसाधारण महिला, बेलवंडी गण- सर्वसाधारण महिला, हंगेवाडी गण- सर्वसाधारण, लिंपणगाव गण - सर्वसाधारण, काष्टी - गण-सर्वसाधारण, अजनूज गण - अनुसूचित जमाती महिला.
राहुरी पंचायत समिती 12 गण
कोल्हार खु गण - सर्वसाधारण, सात्रळ गण - सर्वसाधारण, मांजरी गण - सर्वसाधारण, टाकळीमिया गण - अनुसूचित जाती महिला, उंबरे गण - अनुसूचित जाती महिला, मानोरी गण - अनुसूचित जाती-जमाती महिला, वांबोरी गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणी गण - सर्वसाधारण महिला, गुहा गण - सर्वसाधारण, ताहाराबाद गण - सर्वसाधारण, बारागाव नांदूर गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग, राहुरी खुर्द गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोपरगाव पंचायत समिती 12 गण
धामोरी - सर्वसाधारण, सुरेगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणगाव - अनुसुचीत जमाती, शिंगणापूर - अनुसूचित जाती, करंजी बु - सर्वसाधारण, दहीगाव बोलका - नागरिकांचा मागास प्रवर्ग, संवत्सर- अनुसूचित जाती महिला, कोकमठाण - सर्वसाधारण महिला, जेऊर कुंभारी - सर्वसाधारण महिला, कोळपेवाडी - अनु जमाती महिला, पोहेगाव - सर्वसाधारण, रांजणगाव देशमुख – सर्वसाधारण महिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.