Supriya Sule: महाराष्ट्राच्या लेकीसाठी दिल्ली दरबारी न्याय मागणार; अमित शहांच्या कानावर ही गोष्ट घालणार

Phaltan Woman Doctor Death: "आम्ही माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबियांबरोबर आहोत. कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केला, अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे"
Supriya Sule & Amit Shah
Supriya Sule & Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Phaltan Woman Doctor Death News: फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर सुळे यांनी या घटनेबाबत पोलिस यंत्रणेबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना माहिती देणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट लीक कसा झाला? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी सुळे यांनी माध्यमांसमोर केली. 'सरकार असंवेदनशील आहे. राजकारण बाजूला ठेवून पीडितीला न्याय द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील संशयीतांना क्लिनचीट देऊ नये, असे सुळे म्हणाल्या.

"आम्ही माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबियांबरोबर आहोत. कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केला, अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. खासदार बजरंग सोनवणे आता दिल्लीत जातील तेव्हा ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणातील वास्तव ते त्यांना सांगतील, असे सुळे म्हणाल्या.

Supriya Sule & Amit Shah
Nashik Politics: उदय सांगळेंचा भाजप प्रवेश कोणाच्या पथ्यावर? झिरवाळ-कोकाटेंबाबत योगायोग

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

  • सरकारमधील काही नेत्यांकडून अतिशय संवेदनशीलपणे काही विधाने करण्यात येत आहेत,हे अतिशय दुर्देवी आहे.

  • घटनेतील मुलगी कर्तुत्वान मुलगी होती. दुर्देवाने कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी फलटणच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्याबाबत बोलले होते.

  • महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी आम्ही बोललो तेव्हा समजलं की पूर्ण विशेष तपास पथकाची नियुक्ती केलेली नाही.

  • राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com