
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून RSSच्या कार्याचे कौतुक करत 100 वर्षांच्या सेवाभावी कार्याला अभिवादन केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींच्या विधानावर टीका करत, स्वातंत्र्य चळवळीतील RSSच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
सपकाळांनी मोदींच्या रोजगार व आर्थिक घोषणांवर फसवी आश्वासने असल्याचा आरोप केला आणि भाजप सरकारच्या "वन नेशन" संकल्पनेवरही टीका केली.
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरंगा फडकावला. यावेळी त्यांनी भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) स्तुतीसुमनं उधळली.
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या RSSच्या कार्याचं मोदींनी कौतुक केलं. देशात मोदी पर्व सुरु होण्याअगोदर म्हणजे 2013च्या पहिले आरएसएबाबत मोदींनी अशा प्रकारे कधीही प्रशंसा केली नव्हती. यावरुन काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींच्या विधानावर टीका केली आहे. मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसकडून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सपकाळ बोलत होते.
प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलले त्याप्रमाणे वागत होते पण त्याला मागील ११ वर्षात याला बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. रा. स्व. संघाबद्दल मोदी आज जे बोलले तेही खोटेच बोलले, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.स्वातंत्र्य चळवळ व रा. स्व. संघाचा संबंध काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सपकाळ म्हणाले, "भारताची फाळणी ही एक दुःखद घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल होते म्हणून देश एकसंध राहिला नाहीतर ६०० देश झाले असते. फाळणीचे दुःख आहेच पण भाजपा सरकार १३ ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा फतवा काढते, हा काय प्रकार आहे. १९४२ चे चले जाव आंदोलन सुरु होते तेव्हा रा. स्व. संघ, सावरकर कोठे होते, हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी कोणी मोठी किंमत मोजली हे सर्वांना माहित आहे. देशात आज बेशिस्त वाढली आहे आणि ती काँग्रेसच दूर करु शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे,"
आजपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू करण्यात आल्याची घोषणा मोदींनी लाल किल्ल्यावरुन केली. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळणाऱ्या तरूण किंवा तरूणीला सरकारतर्फे 15 हजार रुपये दिले जाणार असल्याचे मोदींनी सांगितले. यावर सपकाळांनी मोदींना त्यांच्या जुन्या घोषणेची आठवण करुन दिली.
दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू या सारख्या घोषणा मोदींनीच दिल्या होत्या पण त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ही घोषणा सुद्धा फसवीच ठरेल असेही सपकाळ म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदीबवर सपकाळ यांनी टीका केली. वन नेशन वन इलेक्शन एवढ्यापुरतेच हे मार्यादित नाही तर वन नेशव वन लिडर, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टिव्ही चॅनल व एकच व्यंजन ही संकल्पना भाजपाला राबवायची आहे. हा हास्यास्पद प्रकार आहे, असे सपकाळ म्हणाले.
आज मी अभिमानाने सांगतो की 100 वर्षांपूर्वी आरएसएसचा जन्म झाला.
हा राष्ट्रसेवेचा 100 वर्षांचा एक गौरवशाली आणि सुवर्ण अध्याय आहे.
सेवा, समर्पण, संघटन आणि शिस्त ही आरएसएसची ओळख आहे.
राष्ट्रनिर्माणाच्या या संकल्पनेसह स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले.
आरएसएस ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे.
संघाचा 100 वर्षांचा त्यागाचा इतिहास आहे.
Q1. RSSबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटले?
A1. मोदींनी RSSच्या 100 वर्षांच्या सेवा, शिस्त व राष्ट्रनिर्माणातील योगदानाचे कौतुक केले.
Q2. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी कोणती टीका केली?
A2. त्यांनी RSSचा स्वातंत्र्य चळवळीशी काही संबंध नसल्याचा दावा केला आणि मोदींच्या घोषणांना फसवी ठरवले.
Q3. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेबाबत काँग्रेसची भूमिका काय आहे?
A3. काँग्रेसने ही घोषणा फसवी असल्याचे म्हटले आणि पूर्वीच्या आश्वासनांची आठवण करून दिली.
Q4. सपकाळांनी भाजपच्या "वन नेशन" संकल्पनेवर काय प्रतिक्रिया दिली?
A4. त्यांनी "वन नेशन वन इलेक्शन"बरोबरच भाजपला "वन नेशन वन लिडर"ची संकल्पना राबवायची असल्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.