Pune Koregaon Land Scam: वडील पुण्याचे पालकमंत्री! मुलगा ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही...

Pune Land Scam News Ambadas Danve Attack ON Parth Pawar: चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादांनी पदापासून दूर राहावे, नैतिकदृष्या अजितदादांनी राजीनामा द्यावा. शहाण्याला शब्दाला मार हे अजित पवारांना माहित नसावे?
Pune Land Scam News Ambadas Danve Attack ON Parth Pawar
Pune Land Scam News Ambadas Danve Attack ON Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Land Scam News Update: सिंचन गैरव्यवहाराच्या आरोपांमधून अजित पवार बाहेर पडत असतानाच आता त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरील आरोपांमुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्यातील कोरेगाव पार्क-मुंढवा परिसरातील महार वतनाच्या जमिन प्रकरणी पार्थ पवारांचे नाव आल्याने विरोधकांनी अजितदादांना धारेधर धरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावरुन अजित पवारांना कोंडीत पकडले आहे.

पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने मुंढवा परिसरातील महार वतनाची तब्बल 1804 कोटी किंमतीची जमीन, फक्त 300 कोटींत खरेदी केली असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. "माझा त्या व्यवहाराशी दुरान्वये संबंध नाही, मी कुणालाही फोन केला नाही किंवा चुकीच्या कामाला माझं कसलंही समर्थन नाही," अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी जरुन चौकशी करावी, असेही अजितदादा म्हणाले.

अंबादास दानवे यांनी अजितदादांच्या स्पष्टीकरणाची खिल्ली उडवली आहे. "मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही... आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत.. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? अशा शब्दात दानवे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. "बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या," असा सल्ला दानवेंनी त्यांना दिला आहे.

Pune Land Scam News Ambadas Danve Attack ON Parth Pawar
Parth Pawar: पार्थ पवार प्रकरणात अण्णा हजारेंची एन्ट्री! मंत्र्याचं पोरगं चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष

चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादांनी पदापासून दूर राहावे, नैतिकदृष्या अजितदादांनी राजीनामा द्यावा. शहाण्याला शब्दाला मार हे अजित पवारांना माहित नसावे, अशी खोचक टिका दानवेंनी केली आहे. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही मुख्यमंत्र्यांनी समिती नेमावी, अशी मागणी दानवे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

अजित पवार म्हणतात..

सध्या चॅनेलमध्ये जे काही चाललंय, जे प्रश्न आहेत, त्याची मी माहिती घेईन. कारण, मागे 3-4 महिन्यांपूर्वीही अशा-काही गोष्टी चालल्याचं कानावर आलं. त्यावेळेसच मी सांगितलं की, असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या चुकीच्या गोष्टी कुणीही करू नका अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या, परंतु त्यानंतर काय झालं ते मला माहिती नाही.

मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे.

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी समिती तपास करणार आहे. नोंदणी उपमहानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सात दिवसांत चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश नोंदणी महानिरीक्षकांनी दिले आहेत. नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करणार आहे. याप्रकरणी तहसिलदार आणि दुय्यम निबंधकांचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com