पुणे : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याापासून आघाडी सरकारमधील घटक पक्ष आणि भाजप राज्यातील वाद नवीन नाही. अनेक विषयावरुन भाजपचे नेते हे आघाडी सरकारच्या नेत्यांवर निशाणा साधताना दिसतात. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडतात. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यातील कलगीतुरे नेहमीच रंगत आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतीच सांगली येथे पवारांवर टीका केली होती. या टीकेवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते संतप्त झाले आहेत. चंद्रकांत पाटलांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शकल लढवली आहे. त्यांनी चंद्रकांत पाटलांना अनोखी भेट देऊन त्यांची 'चंपी' केली.
संदीप काळे असे या पुण्यातील कार्यकर्त्यांचे नाव आहे. संदीप काळे (Sandeep Kale) यांनी चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) डोक शांत ठेवण्यासाठी चक्क नवरत्न तेल पाठविले आहे. याबाबत संदीप काळे चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाले, ''आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे.'' ''तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्व खर्चांने करतो,'' असा इशारा काळे यांनी त्यांना दिला आहे.
नवाब मलिक अडचणीत ; 'लेडी डॅान'चा पलटवार
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik)यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीवर आजच्या पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. मलिक यांनी आपल्या टि्वट हॅडलवरुन काही फोटो शेअर करुन वानखेडे व फ्लेचर पटेल, 'लेडी डॅान' यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर फ्लेचर पटेल, लेडी डॅान आणि समीर वानखेडे यांचा काय संबध असा सवाल मलिक यांनी केला. याबाबत एनसीबीनं खुलासा करावा, अशी मागणी मलिक यांनी केली. नवाब मलिक (nawab malik) याच्या या आरोपाला फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलं आहे. लेडी डॅान कोण, याबाबत फ्लेचर पटेलांना सांगितले, पटेल यांनी सांगितले की, त्या फोटोमध्ये ज्या लेडी डॅान आहेत. त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्ता आहेत. म्हणून त्यांना आदराने 'लेडी डॅान' म्हणतो. त्यांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावली होती. त्या समीर वानखेडेंच्या थोरल्या भगिनी अँड. जास्मिन वानखेडे (jasmine wankhede) आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.