Maratha Arakshan Resignation :
Maratha Arakshan Resignation :Sarkarnama

Maratha Reservation Resignation : मराठा आरक्षणासाठी 'या' आमदार-खासदारांचा राजीनामा; आंदोलनाची धग वाढली!

Maratha Arakshan MLA MP Resignation : राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले आहे.
Published on

Maratha Arakshan MLA MP Resignation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आर या पारचा लढा पुकारला आहे. जरांगेच्या राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असून, राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले आहेत, तर दुसरीकडे राजीनामा सत्रही सुरू झाले आहे. अनेक आमदार-खासदारांनी या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला किंवा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. (Latest Marathi News)

शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील, हेमंत गोडसे, तसेच काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अतुल बेनके, भाजपचे आमदार लक्ष्मण पवार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला पाठिंबा म्हणून या आमदार, खासदारांनी आपले लोकप्रतिनिधित्वाचा त्याग करण्याची तयारी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकांचा धडाका

दरम्यान, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ओबीसी नेते छगन भुजबळ व प्रकाश शेंडगे हेही 'सागर'वर दाखल झाले. पाऊण तासाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाले.

वर्षावरील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीनंतर शिंदे व फडणवीस यांच्यातही बंदद्वार चर्चा झाली, तर आज शिवसेना आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली आहे. अशातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्या. शिंदे समितीचा अहवाल मांडून त्याला मंजुरी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या जनभावना आणि राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन विशेष अधिवेशन घेण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com