Riteish Deshmukh : रवींद्र चव्हाणांचा 'घाव' देशमुख बंधुंच्या जिव्हारी; रितेशने दोन वाक्यातच दिलं 'सणसणीत' उत्तर

BJP Ravindra Chavan statement Deshmukh family : रवींद्र चव्हाणांच्या देशमुख बंधूंवरील वक्तव्यावर अभिनेता रितेश देशमुखांनी दोन वाक्यात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Riteish Deshmukh reaction to Ravindra Chavan
Riteish Deshmukh reaction to Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या असून, त्यातूनच आता एका वादग्रस्त विधानामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना त्यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत विधान केलं. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे लगेचच वाद निर्माण झाला आणि काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Riteish Deshmukh reaction to Ravindra Chavan
Ajit Pawar : "दादा येणार, गुलाल उधळणार? अजित पवारांच्या एका दौऱ्यावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य

विलासराव देशमुख हे लातूरचे लोकप्रिय नेतृत्व मानले जात होते. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि त्याआधीही लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या आठवणी पुसल्या जातील, असं विधान केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. काँग्रेस नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध करत भाजपवर जोरदार टीका केली.

या वादात आता अभिनेता आणि विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ठाम शब्दांत उत्तर दिलं. "लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात, ती सहज पुसता येत नाहीत, असं म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. लिहिलेलं पुसता येतं, पण मनावर कोरलेलं नाही," अशा शब्दांत त्याने अप्रत्यक्षपणे टीकाकारांना उत्तर दिलं. रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

Riteish Deshmukh reaction to Ravindra Chavan
Malegaon Election Controversy : "ना अर्ज भरला, ना सही केली!" निवडणूक आयोगाच्या यादीत नाव, उमेदवार म्हणते मी 'फॉर्मच भरला नाही'! मालेगावात 'अजब' प्रकार उघड

या प्रकरणावरून सध्या लातूरसह संपूर्ण राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. पुढील काळात या वादाचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com