Rohit Pawar On Police Recruitment : मंत्रिमंडळाच्या विस्तारात गुंतले सत्ताधारी; आमदार पवार म्हणाले, 'ही प्रगत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट'

Participation Of Highly Educated Youth In Police Recruitment Rohit Pawar Reaction : राज्यात उद्यापासून पोलिस भरती सुरू होत असून 17 हजार 471 पदांसाठी 17.66 लाख अर्ज आहेत. या भरतीत 40 टक्के उच्चशिक्षितांचे अर्ज आहे. ही चिंतनाची गोष्ट असून, सर्वसामान्यांचे विषय चर्चेत कधीतरी येतील अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.
Rohit Pawar On Police Recruitment
Rohit Pawar On Police Recruitment sarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : राज्यात पोलिस भरतीसाठी डाॅक्टर्स, इंजिनिअर, वकिलीचे शिक्षण पूर्ण झालेले उतरले आहेत. या पोलिस भरतीत तब्बल 40 टक्के उच्चशिक्षितांचा समावेश दिसतो. ही प्रगत महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. भारतीमध्ये सहभागी झालेल्या उच्चशिक्षित युवकांवरून आमदार रोहित पवार यांनी सर्वच राजकीय पक्षांना चिंतनाची वेळ आल्याचे ट्विट केले.

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण सर्वसामान्यांचे विषय मुख्य चर्चेत कधी येतील, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

राज्यात उद्यापासून पोलिस (Police) भरती सुरू होत आहे. 17 हजार 471 पदांसाठी 17.66 लाख अर्ज आहे. जिल्हानिहाय पोलिस भरतीचे नियोजन आहे. एकूण जागा 17 हजार 471 पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या बघितल्यास एका जागेसाठी 101 उमेदवारांमध्ये स्पर्धा असणार आहे. विशेष म्हणजे, या भरतीत 40 टक्के उच्चशिक्षितांचे अर्ज आहे.

डाॅक्टरर्स, इंजिनिअर आणि वकिलीचे शिक्षण घेतलेले आहे. पोलिस भरतीत वाढलेल्या उच्चशिक्षितांवरून आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच राजकीय पक्षांना चिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यात चूक कोणाची? असा प्रश्न देखील केला आहे.

Rohit Pawar On Police Recruitment
Video Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रिया 19 जूनपासून सुरू,राज्यात 17 हजार 471 जागांसाठी 17 लाखांहून अधिक अर्ज

यामध्ये चूक कोणाची? इंजिनिअरींग, डाॅक्टरकी, वकिलीसारखे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी भेट नाही. म्हणून पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवकांची की, युवांना रोजगार उपलब्ध न करू शकणाऱ्या व्यवस्थेची?, असा सवाल करत ही बाब अतिशय चिंताजनक आहे. तसेच महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar On Police Recruitment
Sadashiv Lokhande : 'अयोध्येतील प्रभू रामलल्लाच्या मंदिरामुळे पराभव'; शिवसेनेच्या लोखंडेंच्या कारणावर भाजप खवळणार?

प्रगत महाराष्ट्रात दुर्दैवाने याची चर्चा होत नाही. हे विषय सर्वसामान्यांचे आहेत. गरिबांचे आहेत. रोजगारांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कुठले खाते मिळेल, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, यावर मात्र रोज चर्चा होते. ही चर्चा जोरदार असते. तसे काही यातून सर्व काही थांबणार आहे. मात्र आज सर्वच राजकीय पक्षांनी खऱ्या अर्थाने चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्यांचेही विषय कधीतरी मुख्य चर्चेत येतील ही अपेक्षा, आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com