Sadashiv Lokhande : 'अयोध्येतील प्रभू रामलल्लाच्या मंदिरामुळे पराभव'; शिवसेनेच्या लोखंडेंच्या कारणावर भाजप खवळणार?

Sadashiv Lokhande Mentioned The Temple In Ayodhya For Defeat : शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शिर्डीतील पराभवाचे कारण अयोध्येतील प्रभू श्रीराम लल्लाचे मंदिर असल्याचे सांगितले. याशिवाय शिर्डीतील कारखानदारांच्या राजकीय गटबाजीमुळे देखील पराभवाला समोरे जावे लागले.
Sadashiv Lokhande
Sadashiv Lokhandesarkarnama
Published on
Updated on

Sadashiv Lokhande News : लोकसभा निवडणुकीचा अपयश आपले असून यात कोणाचा दोष नसल्याचे सुरूवातीला म्हणणारे शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पराभवाचे एक वेगळं कारण सांगून गोंधळ उडवून दिला आहे. सदाशिव लोखंडे यांचे हे कारण वादग्रस्त आहे की, नाही ते आता भाजप ठरवले.

"प्रभू श्रीराम लल्लाचे अयोध्येत बांधण्यात आलेले मंदिर माझ्या पराभवाचे कारण आहे. शिर्डी मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना हे मंदिर रुचले नाही", असे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनाविरुद्ध शिवसेना (Shiv Sena), असा संघर्ष झाला. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा या मतदारसंघात पराभव झाला. महायुतीत असून देखील सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाल्याने त्याची वेगवेगळी कारणं पुढे केली जात होती. यावर सदाशिव लोखंडे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे, महायुतीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप कष्ट केले. पण मीच कोठेतरी कमी पडलो, असे सांगून पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु आता सदाशिव लोखंडे यांनी पराभवाचे वेगळेच कारण पुढे केल्याने गोंधळ उडाला आहे.

Sadashiv Lokhande
Ajit Pawar Vs Nilesh Lanke : अजितदादा अन् खासदार लंकेंमध्ये 'टशन' रंगणार, राणी लंकेंना कोण रोखणार?

सदाशिव लोखंडे यांच्या या कारणामुळे शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर भाजपची नाराजी ओढवून घेतल्यासारखे झाले आहे. सदाशिव लोखंडे यांच्या या कारणावर भाजप खवळणार, असे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सदाशिव लोखंडे यांच्या या कारणाला कशापद्धतीने घेतात याकडे लक्ष लागले आहे.

सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तिथे वेगवेगळा आदिवासी समाजाच्या अनेक प्रथा आहे. रावणाला मानणारे बरेच आदिवासी या मतदारसंघात आहेत. अयोध्येत बांधलेले राममंदिर या समाजाला रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका थेट मला मतदानात बसला. याशिवाय मतदारसंघात कारखानादारी आणि त्यांचे राजकीय गट वेगवेगळे आहेत. याचा देखील राजकीय फटका होत माझा शिर्डीत पराभव झाला.

Sadashiv Lokhande
Shivsena News : विधानसभेसाठी ठाकरेंच्या सेनेची साताऱ्यात चाचपणी; भास्कर जाधवांवर विशेष जबाबदारी

सदाशिव लोखंडे कर्जत येथे माध्यमांशी संवाद साधला. शिर्डी मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. शिर्डी मतदारसंघात कारखानदारांचे वर्चस्व आहे. यातून तिथे राजकीय गट वेगवेगळी असून, त्यांची मोट बांधणे अवघड आहे. खूप कसरत करावी लागते. मंत्रा राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वाद वेगळाच आहे. कुठे काही करायला गेलो की, त्याचा थेट राजकीय घडामोडी रुपांतर होते. यातून राजकारण रंगते. याचाच फटका निवडणुकीला बसतो. या निवडणुकीला माझ्याबाबतीत तेच झाले, असे सदाशिव लोखंडे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com