गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक : संभाजी ब्रिगेडचे साहित्य संमेलनात कृत्य

संभाजी ब्रिगेडने शाईफेक केल्याचा दावा (Sambhaji brigade throw ink on Girish Kuber face)
Girish Kuber
Girish Kuber Sarkarnama

नाशिक : जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर नाशिक येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केले आहे. कुबेर लिखित ‘Renaissance State’ या पुस्तकाचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने शाईफेक केल्याचा दावा केला आहे. या निमित्ताने या पुस्तकाचा वाद पुन्हा एकदा ताजा झाला आहे. या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केले असल्याचा दावा करण्यात येत होता.

नाशिकच्या साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. कार्यक्रमाची सांगता होत असताना आज एक परिसंवाद होणार आहे. या परिसंवादासाठी गिरीश कुबेर आज नाशिक मध्ये आले आहेत. या दरम्यान संभाजी ब्रिगेडने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्या निषेधाच्या घोषणा देवून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला. गिरीश कुबेर यांची या बाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत या कृत्याचा निषेध केला आहे.

Girish Kuber
Good News : अर्ध्या भारताचे पूर्ण लसीकरण, हिमाचलची दुसऱ्या डोसमध्येही बाजी

संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी याबाबातची जबाबदारी स्विकारली आहे. याबद्दल 'Abpमाझा' वृत्तवाहिनीशी बोलताना नितिन रोटे पाटील म्हणाले, 'संभाजी महाराजांवर गिरीश कुबेर यांनी पुस्तक लिहिले, त्यात संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदे यांची बदनामी केली. त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड त्यांच्यावर लक्षच ठेवून होते, आज पट्ट्यात येतील, उद्या पट्ट्यात येतील, शेवटी आज ते संभाजी ब्रिगेडच्या वाघांना भेटलेच! शेवटी वचपा काढलाच असेही ते म्हणाले.

Girish Kuber
८० हजार कोटींचा भ्रष्टाचार? कॅगच्या अहवालाने बिहारच्या राजकारणात खळबळ

या वर्षीच्या मे महिन्यामध्ये गिरिश कुबेर यांनी लिहिलेले ‘Renaissance State’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या पुस्तकातमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केला असल्याचा दावा करत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे हे पुस्तक मागे घेवून त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी त्यासाठी निषेध आंदोलनही करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com