Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपतीं'च्या समाधीपेक्षा वाघ्या दंतकथेची उंची मोठी का? संभाजीराजे छत्रपती सरकारला दिलं चॅलेंज!

Sambhaji Raje Chhatrapati press conference removal Waghya dog memorial Raigad Fort : संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची भूमिका कायम असल्याचे सांगितले.
Sambhaji Raje Chhatrapati
Sambhaji Raje Chhatrapatisarkarnama
Published on
Updated on

Waghya Dog Memorial : संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधी हटवण्याच्या मागणीवर ठाम असल्याची भूमिका पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

"वाघ्या कुत्रा ही दंतकथा आहे. एका 'राजसंन्यास' नाटकातून या वाघ्या कुत्र्याची दंतकथा जन्माला आली. ही कथा एवढी मोठी झाली की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीपेक्षा वाघ्या कुत्र्याचे स्मारक उंचीने मोठे झाले. यातून 'छत्रपतीं'ची बदनामी आहे ना? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपतींनी केला.

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषदेच्या सुरवातीला रायगडावरील छत्रपतींच्या समाधीचे जुने छायाचित्र दाखवले. 1925, 1926, 1936 काळातील हे छायाचित्र असल्याचा दावा करत, त्यावेळी छत्रपतींच्या जीर्णोद्धराचे काम झाले. तेव्हा, आणि त्यानंतर 1818, 1885 मध्ये देखील काही तज्ज्ञांनी रायगड किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. संशोधन केले. पण त्यात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ आला नाही, याकडे लक्ष वेधले.

Sambhaji Raje Chhatrapati
Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या नावे विरोधकांना फडणवीसांनी का मारला टोला?

महाराष्ट्राच्या (Maharashtra) इतिहासकाराने किंवा केंद्रातील तज्ज्ञांनी, डाव्या-उजव्यांनी कुणीही वाघ्या कुत्र्यांचे पुरावे आहेत, असे सांगून समोर यावे. शिवाजी महाराज यांच्यावेळी कुत्रे होते का? असा प्रश्न करताना, त्यावेळी देखील कुत्रे असू शकतात. मी नाकारत नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

Sambhaji Raje Chhatrapati
Yogi Adityanath : कॉमेडिअन कुणाल कामराच्या विडंबनावर योगी आदित्यनाथ भडकले; म्हणाले, 'दुर्दैवाने काही लोक समाजात फूट...'

पण ही दंतकथा 'राजसंन्यास' या नाटकातून सुरू झाली. या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची पूर्णपणे बदनामी केली. 'राजसंन्यास' या नाटकाच्या दंतकथेतून हा वाघ्या कुत्र्याचा जन्म झाला आणि तिथं स्मारक बांधलं गेले. या व्यक्तिरीक्त कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही. माझे खुलं चॅलेंज आहे की, इतिहाकार, तज्ज्ञ, वाघ्याचं स्मारक काढण्यासाठी विरोध करणाऱ्यांना सरकारने बोलावे, आणि त्यावर खुली, समोरासमोर चर्चा करावी, असे संभाजीराजे छत्रपतींनी आव्हान दिले.

बलिदान दिलेल्या मावळ्यांची समाधी नाही अन्...

कुठलेही पुरावेत नाही. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. दंतकथेतून वाघ्या कुत्रा आला. वाघाच्या स्मारकाची उंचीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीहून अधिक आहे. हे कोणत्या शिवभक्ताला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीवेळी अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. त्यांच्या समाधी मिळत नाही. सापडत नाही. ते कोठे आहेत माहीत नाही आणि वाघ्या कुत्र्याची समाधी उभं राहिलं, याकडे संभाजीराजे छत्रपतींनी लक्ष वेधले.

तुकोजी महाराजांचे नाव जोडून बदनामी

इंदौरचे तुकोजी महाराज होळकरांचे नाव घेतले यात जोडले जात आहे. त्यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी मदत केली. मल्हारावर होळकर, यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदवी स्वराज्यसाठी आयुष्य दिले. अशावेळी तुकोजी महाराज एका कुत्र्याच्या समाधीसाठी कसे मदत करतील? यातून तुकोजी महाराज यांची बदनामी करत आहात, असा आरोप संभाजीराजे भोसले यांनी केला.

धनगर समाज खूप विश्वासू

धनगर समाज खूप विश्वासू आहे. मला आयुष्यभर संभाळले, जेवण दिलं, तो स्वयंपाकी धनगर समाजाचा आहे. सेवक, चालक आणि अंगरक्षक हा धनगर समाजाच आहे. इथं कुठेही जातीचा विषय आहे. यातून विषय भरकटवला जात आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचं स्थलांतर करता येईल. रायगडच्या पायथ्याशी नेता येईल.

सरकारने अतिक्रमण काढावे

मी गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात अल्टिमेटम दिलेला नाही. 31 मे रोजीचा कोणताही अल्टिमेट नाही. 31 मे रोजीपर्यंत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे. यात वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा एक टक्के पुरावा नाही, इतिहास सांगतो आहे. मग सरकारच्या अल्टिमेटमनुसार हे अतिक्रमक काढावे, अशी आमची मागणी आहे, असेही छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com